विज्ञानामागील सायन्स

जपानमधील 10 हजार वर्षापुर्वी समुद्रात बुडलेले योगागूनीचे विशाल शहर खरंच अस्तित्वात होते का?

Author:अभिषेक ठमके

जपानमधील योनागुनीच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अंदाजे 10,000 वर्ष जुने समुद्रात बुडलेले अवशेष सापडले, ज्याच्या उत्पत्तीच्या निष्कर्षावरून बरेच वाद निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात तज्ञ असे मानतात की ते मानवनिर्मित आहे, तर अधिक पुराणमतवादी शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, दगडांची ती संरचना नैसर्गिक आहे.
 

 
1995 मध्ये ओकिनावा किनाऱ्यापासून खूप दूर भरकटल्यानंतर एका स्कूबा डायव्हरनं (Diver) ही अलौकिक आणि विस्मयकारक जागा सर्वप्रथम पाहिली. एका डोंगराच्या कडेला टेरेस बांधतात, त्याप्रमाणे रचना असलेल्या ब्लॉक्सच्या बुडलेल्या दगडावर अडखळल्यानंतर त्याला या जागेची माहिती मिळाली. ही संरचना प्रकाशझोतात येताच बऱ्याच चर्चा झाल्या. जगभरातून डायव्हिंग पुरातत्वशास्त्रज्ञ, मीडिया आणि तज्ज्ञांनी जागेला भेट दिली. पण त्यातील कुणालाही या जागेचा उल्लेख असल्याची निश्चित माहिती नव्हती.

संपूर्ण जागेचा डेटा गोळा करण्यासाठी आणि संरचनेचा नकाशा काढण्यासाठी पुढील वर्षभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. या प्रक्रियेत अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले. ज्यात दगडांची एक महाकाय कमान किंवा प्रचंड दगडांच्या ब्लॉकचे प्रवेशद्वार असल्याचे समोर आले. त्यात दगडांना अगदी अचूकपणे एकत्र रचले होते, कोरीवकाम केलेल्या त्या दगडांचे कोन व्यवस्थित रचले होते, तिथे रस्ते, क्रॉसरोड आणि भव्य पायऱ्या देखील आढळून आल्या, ज्यांना कोरीव भिंतींनी वेढले होते.


 
ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील ग्रीड-शोध नमुन्यांचा वापर करून तज्ञ स्कुबा डायव्हर्सची टीम बाहेर पडली तेव्हा, त्यांना किनाऱ्यालगत तीन ठिकाण पाच जागांवर पुरातत्व अवशेष सापडले, जे साधारणपणे 100 ते 200 फूट खोल होते. हे अवशेष मानवनिर्मित असल्याचे अनेक पुरावे तिथे होते, जसे की दोन गोल छिद्र (सुमारे दोन फूट रुंद) आणि लहान छिद्रांची सरळ पंक्ती जी प्राचीन कोतारांप्रमाणे, वेजद्वारे मोठ्या खडकाचे तुकडे करण्यासाठी वापरात असत.

रिकीयस विद्यापीठाचे समुद्री भूकंपाचे अभ्यासक प्राध्यापक मसाकी किमुरा यांनीही अनेक गोष्टी निदर्शनास आणल्या, जसे की अधिक (+) चिन्ह आणि व्ही (V) आकार, असे दर्शविते की मानवाने दगडावर काम केले आहे. आणि असे कोरीव काम कुसाबी नावाच्या वेल्ससारख्या साधनांनी केले होते.


 
योनागुनी येथे पाहिली गेलेली बरीच वैशिष्ट्ये जगभरातील नैसर्गिक वाळूच्या खडकामध्ये देखील पाहिली जातात, त्यांच्या लहान भागात अनेक विचित्र रचना आणि कधीतरी चमत्कारिकपणे 90 अंशाचा कोन देखील आपले लक्ष वेधून घेतो. म्हणूनच योनागुनी येथे कोरीव वैशिष्ट्ये असूनही, शास्त्रज्ञांचा एक छोटासा गट अजूनही आहे, ज्यांनी निर्मितीचा अभ्यास केला आहे आणि ज्यांना ठामपणे वाटते की मोठे ब्लॉक्स नैसर्गिकरित्या टेक्टोनिक अभिक्रियांमुळे आणि इतर नैसर्गिक घटनांमुळे तयार झाले आहे.

बोस्टन विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ रॉबर्ट शॉच एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार, 'भूतकाळात मानवांनी त्या वापरल्या असतील किंवा सुधारित केल्या असतील, पण त्या रचना नैसर्गिकरित्या तयार झाल्या आहेत. ही जागा भूकंपग्रस्त प्रदेशात आहे जिथे भूकंपांमुळे नियमितपणे खडकांना फ्रॅक्चर पडत असतात.'

जॉन अँथनी वेस्ट यांच्या मते, या तथाकथित भिंती फक्त नैसर्गिक आडव्या 'प्लॅटफॉर्म' आहेत, जेव्हा दगड कोसळतात तेव्हा त्या उभ्या स्थितीत पडल्या आणि कथित रस्ते फक्त खडकातील वाहिन्या आहेत.


 
असे असले तरी, अनेक वैज्ञानिक आपल्या मानवनिर्मित पुराव्यांचा शोध घेत आहेत, या विश्वासाने की दगडी बांधकाम ही जुन्या शहराचे अवशेष आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे, त्या आधारे सुमारे 10,000 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आतापेक्षा कमी असल्याने ती शहरे आहे तिथेच वास्तव्यास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, हे अवशेष समुद्रात कोसळल्याचे दिसत नाही.

या मताचा एक समर्थक अन्वेषक आणि संशोधक ग्राहम हॅनकॉकने अंडरवर्ल्ड नावाच्या आपल्या पुस्तकात लिहिले:
"जपानमधील पाण्याखाली गेलेल्या संरचनांनीच मला इतिहासामध्ये जागृत केले की पुरातत्त्ववेत्तांनी न ओळखलेल्या इतिहासातील अंडरवर्ल्ड समुद्राच्या खाली दडलेले आणि विसरले जाऊ शकते" (हॅनकॉक 2002).

हॅनकॉक, योनागुनी आणि टिटिकाका तलावाच्या पाण्याखाली अवशेषांचे आणि भारतातील द्वारका येथे सापडलेल्या इतर अवशेषांमधील साम्य अभ्यासात आहेत, जे मानवी इतिहातील नजरेआड झालेल्या आणि पाण्याखालील पसरलेल्या विशाल जगाच्या अस्तित्वाचा आणखी पुरावा देतात.

जर योनागुनी येथील वास्तू खरोखरच पुरातन शहराचे अवशेष असतील तर जपानमधील प्रागैतिहासिक रहिवासी म्हणजे जोमोन नावाचे लोक आहेत, जे इ.स.पू. 12,000 पासून इ.स.पू. 300 पर्यंत अस्तित्त्वात होते आणि ज्यांनी एक अत्याधुनिक संस्कृती विकसित केली.


 
जोमोनची तुलना बर्‍याच वेळा पॅसिफिक वायव्य उत्तर अमेरिकेच्या पूर्व-कोलंबियन संस्कृतीशी केली जाते. कारण, दोन्ही भागात सांस्कृतिक जडणघडण प्रामुख्याने शिकार करण्याच्या संदर्भात विकसित झाली. नंतरच्या काळाच्या मानकांनुसार त्यांचा समाज 'आदिम' मानला जात असला तरी मुख्य प्रवाहातील सिद्धांतांच्या म्हणण्यानुसार, कुंभाराचा विकास करणारी ही पृथ्वीवरील पहिली संस्कृती होती.

योनागुनी काय आहे आहे, आणि त्याबाबत कोणता निष्कर्ष काढावा, यावर अजूनही एकमत झालेले नाही, तरीही संशोधन चालूच आहे.

आता योनागुनीबद्दल आणखी एक तर्क लावण्यात आला आहे. तो असा की, तेव्हा समुद्रातून जमिनीच्या वरपर्यंत बांधकाम चालू होते, जसे आता आपण पूल बांधतो. पण ती संस्कृती नष्ट झाली आणि ते काम अर्ध्यावरच थांबले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to विज्ञानामागील सायन्स


नाईट वॉक : लघुकथा संग्रह
टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन
मैत्र जीवांचे