सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, रात्रीच्या वेळी आकाशात जे लुकलुकणारे हजारो पृथक प्रकाश बिंदू दिसतात, त्यांना आपण चांदण्या किंवा तारे म्हणतो. तारे लुकलुकतात, तर ग्रह लुकलुकत नाहीत आणि त्यामुळे ग्रह व तारे हे निरनिराळे ओळखता येतात. ग्रह परप्रकाशित असतात, तर तारे स्वयंप्रकाशी असतात. हा नियम जर आपण लक्षात घेतला तर सूर्य हा तारा आहे.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-707779728b106a53d61eb5e0ca9d5a6c

सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्याच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास 5500 केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. त्याच्या वर्णपटामध्ये आयनीभूत व निष्क्रिय धातूंच्या रेषा आहेत. V म्हणजे सूर्य हा बहुतेक इतर ताऱ्यांसारखा 'मेन सिक्वेन्स' मधील तारा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून आहे त्यामुळे तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. आपल्या आकाशगंगेत 100 दशलक्षापेक्षाही अधिक तारे G2 वर्गात मोडतात. लोगॅरिथमिक आकारमान वर्गीकरणावरुन सूर्य आकाशगंगेतील ताऱ्यापेक्षा 85% जास्त तेजस्वी आहे. बाकीचे बरेच तारे हे लाल बटू (Red Dwarf) आहेत. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून 25,000 ते 28,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे 22.5 ते 25 कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला 220 किलोमीटर इतका आहे, म्हणजेच 1400 वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो. तर एक खगोलशास्त्रीय एकक (Astronomical Unit) अंतर 8 दिवसांमध्ये पार करतो.

त्याचे हायड्रोजन इंधन संपल्याने बाह्यावरण प्रसरण पावेल तर केंद्र आकुंचन पावेल व गाभ्याचे तापमान खूपच वाढेल. गाभ्याचे तापमान ३०० कोटी केल्व्हिन इतके झाल्यावर हेलियममध्ये अणू-संमेलन क्रिया सुरू होईल. सूर्याचे बाह्य आवरण प्रसरण पावून त्याचा आकार पृथ्वीच्या कक्षेइतका होईल. सध्याच्या संशोधनानुसार सूर्याने (Red Giant) लाल राक्षसी ताऱ्याच्या सुरुवातीलाच वस्तुमान गमावल्यामुळे पृथ्वीची कक्षा सध्याच्या कक्षेपेक्षा दूर जाईल व सूर्याच्या पोटात जाण्यापासून वाचेल. तरी पृथ्वीवरील पाणी व वातावरण उकळून नष्ट होईल. लाल राक्षसी अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये (Wihte Dwarf) रुपांतरित होईल. हा कमी व मध्यम वस्तुमानाच्या ताऱ्यांमधे आढळणारा जीवनक्रम आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
rautpandurang2014

अप्रतिम लेख

Rajeshri ghape

khup chhan

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to विज्ञानामागील सायन्स


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
सापळा
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
खुनाची वेळ
रत्नमहाल
शिवाजी सावंत
मराठेशाही का बुडाली ?
कल्पनारम्य कथा भाग १