एकला छेडीत आलो एकतारी
नाही रागदारी ठावी मला
कुणी न भेटला साथी मार्गामधी
सूर न संवादी मिळे मला
पिचलेला पावा काढी बदसूर
तसा मी बेसूर गात आहे
बीन छेडी 'आशा' बांधून लोचन
तसा मी जिवन कंठिताहे
केव्हातरी माझी तुटणार तार
एकला जाणार आलो तसा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.