आता निरोपाचे बोलणे संपले !
आत्म्याने अंकिले एकमेका
जीवीच्या धाग्यांची झाली एकजुटी
आता ताटातुटी-भाषा कैची ?
एकजीव झाले अवघ्यांचे भाव
का हो नाव-गाव उठाठेव ?
नव्या देणगीचा घेतलासे कुंभ
नये म्हणो थेंब वेगळाले
भावाबहिणींनो, झाली पाठवण
तरी आठवण संगे राहे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.