प्रभो मी करीन स्फूर्तीने कूजन !
ऊठ ऊठ जीवा, जाहली प्रभात
चंडोल नभात भरारी घे
वार्याच्या झुळुका शीतल मंजुळ
कशा झुळझुळ वाहती या !
किलबिल झाली पाखरांची सुरु
आनंदले तरु गायनाने
जीवनाची माझ्या उजडे पहाट
माझी मला वाट सापडली
प्रभो, मी करीन स्फूर्तीने ’कूजन’
मानूनी पूजन घेई माझे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.