विराटस्वरुपा, ब्रम्हाण्डनायका,

गातो मी आयका भव्य स्तोत्र

भर्जरी सागरी, आभाळी, शाद्वली

नेसवी माउली वस्त्रे तुम्हा

आकाश-तबकी चंद्रसूर्यज्योती

करिती आरती अष्टदिशा

स्वर्गङगा तुमचे चरण प्रक्षाळी

वाहते ओंजळी तारकांच्या

ग्रहमाला गाई धरुनिया फेर

ढाळितो चामर मरुद्गण

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel