६३. नीचाशीं लढण्यापेक्षां पराजय बरा.
(सूकरजातक नं. १५३)
एका जन्मीं बोधिसत्त्व सिंह होऊन अरण्यांत रहात असे. त्या अरण्यांत एका सरोवराच्या कांठीं आपल्या पर्णकुटिका बांधून पुष्कळ तपस्वी रहात असत. आणि कांहीं ग्रामसूकरहि तेथें रहात असत. एके दिवशीं बोधिसत्त्व हत्तीचें मांस यथेच्छ खाऊन त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठीं आला. जवळच एक लठ्ठ डुकर चरत होता. त्या लठ्ठ डुकरावर सिंहाची दृष्टी गेली. व तो मनांत म्हणाला, ''दुसरी कांहीं शिकार सांपडली नाहीं तर या डुकरावर आपला निर्वाह करतां येईल, तेव्हां याला आपली चाहूल न दाखवितां येथून निघून जावें हें बरें.''
असा विचार करून सिंह पाणी पिऊन आड वाटेनें हळूहळू दडत जाऊं लागला. पण त्याला डुकरानें ओळखलें, आणि मोठ्यानें ओरडून तो डुकर म्हणाला, ''कायरे सिंहा, असा भिऊन पळतोस कशाला ? तूं जसा चतुष्पाद आहेस, तसा मीहि चतुष्पाद आहे. तेव्हां घाबरून पळून न जातां माझ्याशीं चार हात कर, व आपला पराक्रम दाखीव.''
सिंह म्हणाला, ''अरे डुकरा, आज मी तुझ्याशीं युद्ध करूं इच्छित नाहीं. आणखी एका आठवड्यानें आम्हीं येथों भेटूं, व त्या वेळीं द्वंद्वयुद्ध करूं.''
डुकराला ही गोष्ट पसंत पडली. तो घरीं जाऊन आपल्या जातभाईंना म्हणाला, ''आज मी मोठा पराक्रम केला आहे ! मला पाहून एक सिंह हळूच दडत पळून जात होता. त्याला मी आव्हान केलें ! परंतु त्याची तयारी नसल्यामुळें त्यानें एक आठवडा मागून घेतला आहे. आणखी एका आठवड्यानें तो माझ्याबरोबर लढाई करण्यास येणार आहे. सिंहाविषयीं आपल्या जातीला उगाच बाऊ वाटत असतो. इतका जर सिंह बळकट असता, तर युद्धाची तयारी करण्यास त्याला एक आठवडा कां लागला असता ? एवढी तयारी करून आला तरी मीं त्याची अशी खोड जिरवतों कीं, त्यानें या अरण्यांत पुनः पाऊल देखील टाकुं नये.''
हें त्या बालिश डुकराचें भाषण ऐकून वृद्ध डुकर म्हणाले, ''बाबारे तुझी बडबड आतां पुरे कर. सिंहानें तुला आठवड्याची मुदत दिली हें तुझें भाग्य समज. हत्तीचें मांस खाऊन सिंह तृप्त झाला असेल, आणि आठवडाभर पुरण्यासारखे मांस शिल्लक असेल म्हणून तुला त्यानें एक आठवड्याची मुदत दिली आहे. हत्तीचें गंडस्थळ फोडणार्या सिंहापुढें तुझ्यासारख्या यःकश्चित प्राण्याचें काय चालणार आहे ? पण तुझा हा मूर्खपणा तुलाच भोंवणार आहे, असें नाहीं. त्याचा परिणाम आम्हा सर्वांना भोगावा लागेल. सिंह तुला मारीलच. पण तेवढ्यानें त्याची तृप्ति न होतां तो आमचा सर्वांचा नाश करील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.