पहाट झाली. मतंग ऋषींना गोड हाका मारून मुलांना उठवलं. मुलं बरोबर घेऊन ते नित्याप्रमाणे नदीवर निघाले; तो काय आश्चर्य! एकाएकी वास आला. सुंदर सुगंध आला. 'कुठून येतो हा गोड वास?' मुले म्हणू लागली. 'जा, शोध लावा.' मतंग ऋषी म्हणाले.

त्या सुगंधाचा शोध लावण्यासाठी मुले निघाली. ज्या बाजून वास येत होता, त्या बाजूने निघाली. ज्या रस्त्याने काल ती रानात गेली होती व परत आली होती, त्या रस्त्याच्या. बाजूने सुगंध येत होता. मुले तिकडे वळली. रामा, त्या मुलांना काय बरे दिसले? त्या मुलांना ठायी ठायी सुंदर फुले फुललेली दिसली. कोठून आली ती फुले? काल नव्हती. एकदम कोठून आली? आकाशातील तारे का आश्रमासमोर येऊन पवित्र होऊ पाहात होते? कोणी लावली ती फुले?
मुले धावत मतंग ऋषींजवळ आली. त्यांनी ती आश्चर्यकथा गुरूंना सांगितली. मंतग ऋषी स्वत: मुलांबरोबर तो अपूर्व देखावा पाहावयास गेले. सूर्याचे कोवळे किरण येत होते. त्या फुलांवर ते नाचू लागत होते. त्या फुलांचे जणू ते चुंबन घेत होते. सुंदर, अपूर्व देखावा! मतंग ऋषी पाहातच राहिले. त्यांनीही भक्तीप्रेमाने त्या फुलांना हात लावून वंदन केले.

'भगवन्, कुठून आली ही फुलं? मुलांनी विचारले.

'तुमच्या घामातून. काल हया रस्त्यानं डोक्यावर मोळया घेऊन तुम्ही आलात. तुमच्या अंगातून घाम निथळत होता. हया पृथ्वीवर तो गळत होता. श्रमांचा पवित्र घाम. निढळाचा घाम. त्याहून पवित्र काय आहे? तुम्ही कसे श्रमलेत, कसे घामाघूम झालेत, हे पाहाण्यासाठी जणू भूमातेनं हे हजारो डोळे उघडले आहेत. तिचं हृदय तुमचे श्रम पाहून जणू फुललं. मुलांनो, श्रमासारखं पवित्र काही नाही; श्रमाचा घाम म्हणजेच देवाचं नाम. तुमच्या मनावर हे ठसविण्यासाठी जिथं जिथं तुमचा घाम पडला तिथं तिथं देवानं फुलं फुलवली आहेत. तुम्ही श्रमांना कंटाळू नये, म्हणून श्रमांचा महिमा प्रभू तुम्हाला हया फुलांच्या रूपानं शिकवीत आहे. श्रमांचा घाम नसेल तर जग कसं चालेल? शेतकरी श्रमणार नाही, त्याचा घाम शेतात पडणार नाही, तर शेतं कशी पिकतील? विणकर वस्त्रं विणताना दमणार नाही, तर अंगावर काय घालाल?

घरं बांधणारे श्रम करून तुमची घरं बांधून न देतील तर रहाल कुठं? ही दुनिया श्रमणार्‍या लोकांमुळं चालली आहे. तुम्ही मोठे झालेत म्हणजे स्वत: श्रमा.श्रमणार्‍या लोकांना मान द्या वेदामध्ये एका थोर महर्षीनं लिहिलं आहे-

'न हि श्रान्तस्य ऋते सख्याय देवा:।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to घामाची फुले