एके दिवशीं वत्सला बकुळीच्या उंच झाडावर जाऊन बसली. आजी शोधीत होती. तिनें हांका मारल्या. वरून कोकिलेनें उत्तर दिलें. वत्सला गाणें म्हणूं लागली.
गाणें (चाल : गोकुळिंचा कान्हा माझा)
असें कुठें राजा माझा सखे मला सांग
सखे मला सांग, सखे मला सांग
असें कुठें राजा माझा सखे मला सांग ॥ ध्रु.॥
अहोरात्र बघतें वाट
आंसवांचा वाहे पाट
अंधकार हृदयीं दाट
वेदना अथांग ॥ असे.॥
असे कुठें माझा नाथ
असें कुठें माझा कान्त
झणीं आण त्याची मात
जळे सर्व अंग ॥ असे.॥
नको सखे मारूं हांक
आस सर्व माझी टाक
आस सर्व झाली खाक
तो न येइ कां ग ॥ असे.॥
नसेल का त्याला हृदय
असेल का भारी अदय
कसा उडी घेतो अभय
कसे फेडुं पांग ॥ असे.॥
जरी न तो धांवुन आला
मला देइं हालाहाला
बकूळिच्या वा फांदीला
सखे मला टांग ॥ असे.॥

'वत्सले, खालीं ये. आजीला रडवूं नकोस.' सुश्रुता डोळयांत पाणी आणून म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel