मला थांबायला व भांडायला वेळ नव्हता, मी त्या दगडी वाडयात गेलो. वाडयात दिवे लागले होते. कुत्रे भुंकूं लागले. भय्याने त्याला गप्प केले. कुत्र्याच्या भुकंण्यामुळे घरातली ती माउली बाहेर आली.
''मी जातो सामान घेऊन,'' मी म्हटले.
''मग येशील ना मुलांना श्किवायला?'' तिने विचारले.
''सकाळी कळवीन,'' मी म्हटले.
''झाली का राहायची सोय? नाहीतर रात्रभर राहा हो इथे. मी त्यांना सांगोन बरं बाळ,'' ती पुन्हा म्हणानी. तो 'बाळ' शब्द मला रडवता झाला. मी माझी वळकटी खाली ठेवली व त्या माउलीच्या पाया पडलो.
''ये हो उद्या, तुझं नाव काय?'' तिने विचारले.
''श्याम'', मी म्हटले.
मी एक टांगा करून आणला. त्यात बसलो; परंतु कोठे जायचे?
''कुठं जायचं राबसाव?'' टांगेवाल्याने विचाारले.
''स्टेशन,'' मी एकदम म्हटले.
टांगा स्टेशनकडे निघाला. 'मी औंधला परत जाता' असे मी स्पष्टपणे कोणासच सांगितले नाही. रामला 'इथे राहतो' म्हणून सांगितले. त्या श्रीमंत घरी 'सकाळी कळवीन' म्हटले. मी भित्रा आहे. एकदम स्पष्ट सांगायला मी भितो. शिवाय माझे विचार इतके भराभर बदलतात,की त्यांचा काही नेमच नसतो. माझ्या ह्या स्वभावामुळेच अनेकांची कुचंबणा होते. मी फसव्या आहे, असा माझ्यावर आरोप करण्यात येतो; परंतु मी हेतुपुर:सर फसवतो असे नाही. मग काहींना तसे वाटले, तर त्यात त्यांचा तरी काय दोष?
मी स्टेशनवर येऊन बसलो. पुन्हा औंधला जायचे! प्रत जाणे म्हणजे फजिती होती. मी पुण्याला गेलो, हे सर्वांना कळलेच असेन. सारे मला प्रन्श्र विचारू नागतील. औंधला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी तेथे स्टेशनात बसून राहिलो. गाडीला बराच अवकाश होता. अद्याप तिकीट सुरू झाले नव्हते. खूप गर्दी होती. इतक्यात एक मनुष्य माझ्याजवळ आला. माझ्या शेजारी बसला.
''कुठे जायचं तुम्हांला?'' त्याने विचारले.
''काही ठरलं नाही,'' मी म्हटले.
''ठरल्याशिवाय स्टेशनवर आलेत?'' त्याने आच्श्रर्याने विचारले.
''मला देवाकडे जायचं आहे,'' मी म्हटले.
''पंढरपूरला येता? मी पंढरपूरचा आहे. चला माझ्याबरोबर.'' तो म्हणाला.
''तुम्ही का पंढरपूरला जाणार?'' मी विचारले.
''माझंही काही ठरलेलं नसंत. मी वा-यासारखा आहे. माझं सामान वगैंरे काही नसतं. घेतलं धोतर, की निघाला,'' तो म्हणाला.
''मला किती तरी वर्षांपूर्वी असाच एक मित्र आगगाडीत भेटला होता, तो असंच म्हणे. तुम्ही दुसरे,'' मी म्हटले.
''मग येता का पंढरपूरला?'' त्याने विचारले.
''किती असेल तिकीट?'' मी प्रश्न केला.
''तीन-चार रूपये असेल.'' तो म्हणाला.
''येतो मी. केव्हा आहे गाडी?'' मी विचारले.
''आता तिकीट सुरूच आहे. द्या पैसे. मी काढतो दोघांची,'' तो म्हणाला.