कशाचा सोहाळा झाला ? विनायक आला जन्माला ।
माता देई देशभक्तिचे स्तन्य बालकाला ।
विनायक आला जन्माला ॥धृ०॥
राधा दामोदर दंपतिचे प्रेम परस्पर दृढ राही ।
भगूर होते गाव सानसे धुनी दारणा जल वाही ।
साहित्याचा छंद पतीला पत्नी गृहकृत्ये पाही ।
सुस्थितिहुनिहि उभय मनांची श्रीमंती नांदे गेही ।
कामी आली ती श्रीमंती स्वदेशकार्याला ।
विनायक आला जन्माला ॥१॥
दीप लाविती भक्तीने ते मदनाच्या मंदिरी ।
ज्योतीच्या तेजांत वेचिती माणीक मोती करी ।
पतिपत्नीचे भाग्य उजळले, कौस्तुभ त्यां लाभला ।
मंजूषा उदराची केली तेथे सांभाळला ।
सूर्यदर्शना गमे कौस्तुभा समय इष्ट आला ।
विनायक आला जन्माला ॥२॥
शक अठराशे पाच संगते ऋतुराजाला घेत करी ।
वैशाखाच्या वद्यपक्षिच्या षष्ठी तिथिचा योग धरी ।
भुवी सोडूनी अंश नियतिचा काल आपला मार्ग धरी ।
राधा-दामोदर दंपतिच्या देई तो दायित्व शिरी ।
मातापित्यांनी स्वागत केले वाढविले बाला ।
विनायक आला जन्माला ॥३॥
स्वयंप्रकाशी अंग जणू हा सूर्याचा कवडसा ।
मातेचे सौंदर्यं पित्याच्या शौर्याचा वारसा,
मखरामध्ये वात्सल्याच्या वाढत गेला जसा ।
मावेना आनंद नभीही तन्मातेचा तसा ।
ह्रदयाशी त्या कवटाळी अन् घेत चुंबनाला ।
विनायक आला जन्माला ॥४॥
संस्कृतिचा त्या असे पाळणा, संस्कृतने डोलतो ।
आरण्यक-उपनिषदांसंगे आनंदे बाल तो ।
चाळा म्हणुनी शिशु बोबडया छंदांनी बोलतो ।
लघुपंडित हा वादविवादी शब्दांना पेलतो ।
तेजाचा कण शिशु सावरकर कुलभुषण झाला ।
विनायक आला जन्माला ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.