स्वाधीन देश झाला तप येतसे फळाला
ह्रत संपदा कशाला? नृप मीच भारताला ॥धृ०॥
अंगावरी सतीची वस्त्रे विराजतांना
देशार्थ देह माझा आगीत पोळतांना
पुष्पे वहात होतो स्वातंत्र्यदेवतेला ।
ह्रत संपदा कशाला नृप मीच भारताला ॥१॥
घरदार वित्त मत्ता यज्ञांत लोटलेली
क्षणमात्र अग्निमाजी वाटे जळून गेली
आली परी वरी ती, घेई विशालतेला ।
ह्रत संपदा कशाला नृप मीच भारताला ॥२॥
वाटा सुखेन लाभॊ स्वातंत्र्यसैनिकांना
त्यांनीही कष्ट केले देशार्थ झुंजतांना
देशात घोळलो मी, माझ्यात देश आला ।
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥३॥
ह्रत शेत वा घराची इच्छा मुळीच नाही
साराच देश माझा देशात भूमि तीही
खावो सुखे कुणीही भूजन्य त्या कणाला ।
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥४॥
इच्छा असे, परी ती पूर्वार्जितांत नाही
बव्हंश देश माझा राष्ट्रध्वजात राही
एका चतुर्थकाला आणील कोण बोला?
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥५॥
ह्रत संपदा कशाला? नृप मीच भारताला ॥धृ०॥
अंगावरी सतीची वस्त्रे विराजतांना
देशार्थ देह माझा आगीत पोळतांना
पुष्पे वहात होतो स्वातंत्र्यदेवतेला ।
ह्रत संपदा कशाला नृप मीच भारताला ॥१॥
घरदार वित्त मत्ता यज्ञांत लोटलेली
क्षणमात्र अग्निमाजी वाटे जळून गेली
आली परी वरी ती, घेई विशालतेला ।
ह्रत संपदा कशाला नृप मीच भारताला ॥२॥
वाटा सुखेन लाभॊ स्वातंत्र्यसैनिकांना
त्यांनीही कष्ट केले देशार्थ झुंजतांना
देशात घोळलो मी, माझ्यात देश आला ।
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥३॥
ह्रत शेत वा घराची इच्छा मुळीच नाही
साराच देश माझा देशात भूमि तीही
खावो सुखे कुणीही भूजन्य त्या कणाला ।
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥४॥
इच्छा असे, परी ती पूर्वार्जितांत नाही
बव्हंश देश माझा राष्ट्रध्वजात राही
एका चतुर्थकाला आणील कोण बोला?
ह्रत संपदा कशाला, नृप मीच भारताला ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.