ओंकारयुक्त हे ध्वजा तुला ।
खड्गाने बघ सहयोग दिला ॥
घेउनी साउलीत भूतला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥धृ०॥
अंगावरचा रंग सदोदित ।
परिसीमा त्यागाची पावत ।
ज्वालेसम तव कांति बिलासत ।
दीप्तीसह नर त्या विकासला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥१॥
स्वस्तिकात सामावे शुचिता ।
कुंडलिनी जिज्ञासेकरिता ।
इडा पिंगला जागृत होता ।
योगाने पावत समाधिला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥२॥
ध्येय जरी नि:श्रेयस अमुचे ।
त्याला आसन अभ्युदयाचे ।
स्वत्व-रक्षणा बळ खड्गाचे ।
इह अध्यात्माची स्पृहा तुला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥३॥
परमार्थाने मन भरलेले ।
हिंदुराष्ट्र त्या पंथे चाले ।
मानवतेचे सार जाणले ।
ओसंडत उत्सव उरातला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥४॥
खड्गाने बघ सहयोग दिला ॥
घेउनी साउलीत भूतला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥धृ०॥
अंगावरचा रंग सदोदित ।
परिसीमा त्यागाची पावत ।
ज्वालेसम तव कांति बिलासत ।
दीप्तीसह नर त्या विकासला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥१॥
स्वस्तिकात सामावे शुचिता ।
कुंडलिनी जिज्ञासेकरिता ।
इडा पिंगला जागृत होता ।
योगाने पावत समाधिला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥२॥
ध्येय जरी नि:श्रेयस अमुचे ।
त्याला आसन अभ्युदयाचे ।
स्वत्व-रक्षणा बळ खड्गाचे ।
इह अध्यात्माची स्पृहा तुला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥३॥
परमार्थाने मन भरलेले ।
हिंदुराष्ट्र त्या पंथे चाले ।
मानवतेचे सार जाणले ।
ओसंडत उत्सव उरातला ।
तू भिडवावे शिर गगनाला ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.