घरटयाच्या परिसरांत सीमित पक्ष्यांचा संसार ।
करुं पाहतो पुरुष महत्तम विश्वाचा व्यापार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥धृ०॥
आपत्ति नसे ही अपघाती ।
चूल बोलकी आपुल्या हाती ।
फोडूनि, त्यांची केली माती ।
विशाल होते लक्ष्य, वाहिले अग्नीला घरदार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥१॥
शोक सहचरी तूं न करावा ।
मनी एक विश्वास धरावा ।
राष्ट्रोद्वारा होम हा नवा ।
तिळतिळ जळतां आयुष्य, जरी झाले कष्ट अपार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥२॥
यज्ञांतुनि या अमृत लाभतां ।
भूमीला मिळतां स्वतंत्रता ।
होतां येथे दृढ मानवता ।
घराघरावरि चढेल सुंदर सोन्याचे कौलार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥३॥
कृतार्थ हो संसार आपला ।
गेहसुखाचा मोह न धरला ।
ध्येयास्तव साही विरहाला ।
विश्वाचा संसार कराया होतों सीमापार ।
तेंचि हो संसाराचें सार ॥४॥
करुं पाहतो पुरुष महत्तम विश्वाचा व्यापार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥धृ०॥
आपत्ति नसे ही अपघाती ।
चूल बोलकी आपुल्या हाती ।
फोडूनि, त्यांची केली माती ।
विशाल होते लक्ष्य, वाहिले अग्नीला घरदार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥१॥
शोक सहचरी तूं न करावा ।
मनी एक विश्वास धरावा ।
राष्ट्रोद्वारा होम हा नवा ।
तिळतिळ जळतां आयुष्य, जरी झाले कष्ट अपार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥२॥
यज्ञांतुनि या अमृत लाभतां ।
भूमीला मिळतां स्वतंत्रता ।
होतां येथे दृढ मानवता ।
घराघरावरि चढेल सुंदर सोन्याचे कौलार ।
तेंचि हो संसाराचे सार ॥३॥
कृतार्थ हो संसार आपला ।
गेहसुखाचा मोह न धरला ।
ध्येयास्तव साही विरहाला ।
विश्वाचा संसार कराया होतों सीमापार ।
तेंचि हो संसाराचें सार ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.