उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥
होती माझ्या मनी अहंता; बंधुने डिवचले ।
सुप्त असूया उसळुन आली सारी चित्तातली ।
रुसलो, उठलो, शाळेला मी निघे त्याच पावली ।
आणि आठवे, मुकलो तव मी प्रेमळ शब्दावली,
माउली प्रेमळ शब्दावली ।
उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥१॥
अज्ञ तुझा मी बालक माते, तुझा आसरा मला ।
सांगे मी सर्वांस, माउली ! मन्माता प्रेमला ।
पश्वात्तापे जळलो आई, कोप सर्व लोपला ।
उपदेशाचा तुझ्या भुकेला पुत्र उभा ठाकला,
आइ गे, पुत्र उभा ठाकला ।
उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥२॥
म्हणती फेरा कल्पानंतर यापरि येतो पुन्हा ।
माता मजला तूंच ! कल्पना देत मना सांत्वना ।
भेटशील ना कल्पांती मज दोषाच्या क्षालना ।
नाहि पुन्हा रुसणार, मला तू ह्रदयी धरशील ना,
माउली, ह्रदई धरशील ना,
उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥३॥
आणि जाणवे झणि, कल्पांतर पुनरपि आल्यावरी ।
रुसवाही अनिवार्य, अबोला मातेचा त्यापरी ।
विषण्ण होई तेव्हा बालक, मनी प्रार्थना करी ।
झाल्या गोष्टी विसर जन्मदे अपराधे मी जरी,
माउली, चुकलो असलो तरी ।
उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥४॥
गेले होते प्राण, कलेवर मातेचे राहिले ।
नसे चेतना तिला पुसाया पाणी नेत्रातले ।
आक्रोशा पाहून यापरी जनमन हेलावले ।
मातेवाचूनि विनायकाला रुक्ष जिणे वाटले,
तयाला रुक्ष जिणे वाटले ।
उष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जय मृत्युंजय


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत