धर्मातीतत्वाच्या नांवे भारत आम्ही भंगला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा
शस्त्राघाते रंगला ॥धृ०॥
बोध घेतला नाही आम्ही लिहिलेल्या पानांतुनी ॥
प्रयोग करतां नवा भारती रक्ताची वाहे धुनी ।
युद्वांवाचुन रक्त सांडले ! कलंक आम्हा लागला ।
श्यामल कोमल भाग भुमिचा
शस्त्राघाते रंगला ॥१॥
परकीयांना सामंजस्ये हिंदुपण सामावते ।
वंशजाति एकत्व साधती हिंदुत्वाची दैवते ।
हिन्दुत्वावर उठण्या जेव्हा वैरी येथे दंगला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा
शस्त्राघाते रंगला ॥२॥
आम्ही जपली शांति बांधले बिसतंतूने कुंजरा ।
उधळे जैसा मत्त मतंगज थरकापत राही धरा ।
अंकुशांतल्या उभ्या शांतिचा
वास न आम्ही पाहिला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा
शस्त्राघाते रंगला ॥३॥
अंतर नाही देव नि दानव यांच्यामधले जाणले ।
आक्रमकांना राष्ट्रामध्ये आसन मानाचे दिले ।
अभय दानवा दिले शांतिचा
अर्थ न आम्हां लागला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा
शस्त्राघाते रंगला ॥४॥
दान दिले परि भूक न शमली उन्मादी कामापरी ।
शांति चिरफळे प्रांतोप्रांती खड्‍गाच्या धारेवरी ।
टाक अगोदर माझा वाटा सोसाटा फोफावला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥५॥
तत्वें उत्तम ! परंतु होती भ्रांतीने व्यवहारिली
करी ठेवली पात, मूठ अन् आम्ही वै-याला दिली ।
अंगावरती उलटुनि आली तत्त्वांची त्या शृंखला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥६॥
वन्हि चेतला होता चित्ती पाहुनि तांडव भारती ।
ज्वाला जाती वा-यासंगे शांतिकोविदा घेरती ।
शांतिवचांचा तो उद्गगाता पंचत्वाला पावला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥७॥
हिन्दुत्वावर दोष लादला तेव्हाच्या अधिनायके ।
चाळण सांगे उपहासाने छिद्रवती तू सूचिके ।
गळ्याभॊवती हिंदुत्वाच्या दोर मृत्युचा बांधला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥८॥
चंद्र चोरतो प्रकाश रविचा म्हणवीतो तारापती ।
राष्ट्रामध्ये बुद्वयंधांच्या चोर ऋषींचे भूपती ।
त्याग कुणाचा ? त्यागावरती सौध कुणी हो बांधला?
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥९॥
हिंदुत्वाचे प्रतीक पडले आक्षेपांच्या पंजरी ।
चार दिशांनी भाले बरच्या तळपत होत्या संगरी ।
पर्वत पडला ! गजराजाचा दंतहि नाही भंगला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥१०॥
जो मृत्युंजय शिवे न त्याला यम स्वतां यमदूत वा ।
मुक्त विनायक सांगे आम्हां हिंदूंच्या गतवैभवा ।
स्वातंत्र्याचा वीर इच्छितो भारतभूच्या मंगला ।
श्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जय मृत्युंजय


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत