विजयाचा सण आला ! मेळा प्रांगणि जमला ।
व्योमी स्वर दुमदुमला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥धृ०॥
पंक्तींत पदाति, वाजि, गज, रथ, रणभेरी
अत्यधुनिक तोफा अन् अण्वस्त्रे भारी ।
चढतां ध्वज आकाशी वाजली तुतारी
करित पुरश्चरण सर्व सैन्य शस्त्रधारी ।
सेनानी हा पहिला । प्रतिशोधा प्यालेला ।
आला मर्दुनि अरिला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥१॥
छळण्याला जे जे या भारतांत आले
शक्त पदाघाताने सर्व ते निमाले ।
शक्तिशाली भूवरि जे देश मानलेले
पाहुनी सशक्त राष्ट्र आज नम्र झाले ।
राजदुत गण जमला । ध्वज गगनी जै चढला ।
जोडुनी करां नमला ।
देण्याला वंदन ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥२॥
ध्वरु दोन्ही हिंदुराष्ट्रसंघ आक्रमीतो
वैद्यक, वाणिज्य, कला क्षेत्र शोधतो तो ।
अवकाशी फिरुनि कुणी विश्वशोध घेतो
रत्नाकर शोधुनि वा देशरत्न होतो ।
विद्या विज्ञान कला । पावती स्वदेशाला ।
शिवनृपवंशज आला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥३॥
व्योमी स्वर दुमदुमला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥धृ०॥
पंक्तींत पदाति, वाजि, गज, रथ, रणभेरी
अत्यधुनिक तोफा अन् अण्वस्त्रे भारी ।
चढतां ध्वज आकाशी वाजली तुतारी
करित पुरश्चरण सर्व सैन्य शस्त्रधारी ।
सेनानी हा पहिला । प्रतिशोधा प्यालेला ।
आला मर्दुनि अरिला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥१॥
छळण्याला जे जे या भारतांत आले
शक्त पदाघाताने सर्व ते निमाले ।
शक्तिशाली भूवरि जे देश मानलेले
पाहुनी सशक्त राष्ट्र आज नम्र झाले ।
राजदुत गण जमला । ध्वज गगनी जै चढला ।
जोडुनी करां नमला ।
देण्याला वंदन ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥२॥
ध्वरु दोन्ही हिंदुराष्ट्रसंघ आक्रमीतो
वैद्यक, वाणिज्य, कला क्षेत्र शोधतो तो ।
अवकाशी फिरुनि कुणी विश्वशोध घेतो
रत्नाकर शोधुनि वा देशरत्न होतो ।
विद्या विज्ञान कला । पावती स्वदेशाला ।
शिवनृपवंशज आला ।
देण्याला वंदना ध्वजाला ।
या महोत्सवाला ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.