दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ।
धरा मृत्युने जसे कुटावे तंतु जीवनाचे ॥धृ०॥
जुटला बंद्यांचा संघात् ठेका धरुनी चाले हात
आघातावरती आघात्
पिंजुनि बनता सळ, आवळती दोर त्या सळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥१॥
दिनभर चाले काथ्याकूट पुरी भरे तंतूंची फूट्
तेव्हा शिक्षेमधुनी सूट्
अमिष तेवढे पुरते वाटे दंडिता फळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥२॥
सडके तुटके फुटके दोर्
नवे व्हावया पुन्हा समोर्
पुन्हा साहती घाव कठोर्
येई नवता, तंतू वळतां तेज ये बळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥३॥
पंचमहाभूतांची खाण्
जीवतंतु करते निर्माण्
विणते आयुष्याचा ताण्
सडे ताण अन् करी वेगळे मृत्यु तंतु त्याचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥४॥
विलीन होता पंचत्वांत्
तंतू पुन्हा रुप घेतात्
नियतीचा जै फिरता हात्
आयुष्याची वटी बने ते जिणे मानवाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥५॥
धरा मृत्युने जसे कुटावे तंतु जीवनाचे ॥धृ०॥
जुटला बंद्यांचा संघात् ठेका धरुनी चाले हात
आघातावरती आघात्
पिंजुनि बनता सळ, आवळती दोर त्या सळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥१॥
दिनभर चाले काथ्याकूट पुरी भरे तंतूंची फूट्
तेव्हा शिक्षेमधुनी सूट्
अमिष तेवढे पुरते वाटे दंडिता फळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥२॥
सडके तुटके फुटके दोर्
नवे व्हावया पुन्हा समोर्
पुन्हा साहती घाव कठोर्
येई नवता, तंतू वळतां तेज ये बळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥३॥
पंचमहाभूतांची खाण्
जीवतंतु करते निर्माण्
विणते आयुष्याचा ताण्
सडे ताण अन् करी वेगळे मृत्यु तंतु त्याचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥४॥
विलीन होता पंचत्वांत्
तंतू पुन्हा रुप घेतात्
नियतीचा जै फिरता हात्
आयुष्याची वटी बने ते जिणे मानवाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.