विधिज्ञांनी पहा राव              येथे कमावले नांव
न्याय-अन्यायाची फॊड     केली आम्हांसी अतोड !
लढविले बुद्विवाद         उंच बांधले प्रासाद
विद्वत्तेचे तुम्हां लेणे       सोडा रक्तांत खेळणे ।
जाँन पार्किन्स पामर      सांगतसे सुविचार
तुम्ही ज्ञानाचे भांडार      करा बुद्वीचा व्यापार ।
देवदानवांचे रण          न्यायान्यायाचें कारण
दैत्यगुरु शुक्रमणी        विद्या होती संजीवनी ।
देवपुत्र कच गेला         संजीवनी शिकण्याला
गेला शत्रूच्या गोटांत      शिरे शुक्राच्या पोटांत ।
मंत्र केला नामशेष        त्यास पावे परमेश
होतां दुर्बळ असुर         झाले जयी सुरवर ।
विनायक चिंती मनीं      जाय मंत्र सहा कानी
गेली गुप्तता लयाला       इंग्रजांचा भाव गेला ।
फोडले मी रिपुद्वार        दैत्यविद्येचे कोठार
सुखेनैव करा वार         नाशंवत हें शरीर ।
म्हणे, पार्किन्सा पामरा     थोर अज्ञानी तूं खरा
अज्ञ लोकांचे भारती       घेतले मी कार्य हाते ।
काम तेंचे लढवितां        शुल्क बेडी येई हातां
मातृमूर्ती देशांतली         तुम्ही रक्ताने माखली ।
धूत मी तें रक्त सारे        शुद्व करितो मंदिरें ।
भव्य सौधासाठी नाही       मिळविली मी विद्या ही
उंच पताकेचा मान         राखण्याला माझे ज्ञान ।
करु देहाची कां चिंता       कृष्ण भारताचा त्राता
देवकार्याचा विस्तार         हाच माझा अलंकार ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel