झालासां उत्तीर्ण परीक्षा । वस्त्रे ही परिधान करा ।
करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥धृ०॥
जाणा या वस्त्रांची महती ।
विद्वत्तेचे रुप दाविती ।
कवच कुंडले जणू शोभती ।
रक्षण करिती आयुष्याचे कीर्तीचा हा नित्य झरा ।
करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥१॥
राजनिष्ठ मी वदा मुखाने ।
सोडा विध्वंसक अभियाने ।
मिरवी पदवी अभिमानाने ।
वंद्य मानणे राजाला हा विद्ववानांचा पंथ खरा ।
करा दूर दारिद्रय आपदा । संपत्तीने भवन भरा ॥२॥
विनायकाने सांगितले-
ऐश्वर्याची दास्यामधल्या किंचित अभिलाषा न मला ।
देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥
विद्वान् ! आपण विधी जाणतां ।
अधिक्षेप हा कशास करिता ।
अटीच देऊं कशी मान्यता ।
जेत्याला जित वंद्य मानुनी सांगा कोण कधी नमला ।
देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥३॥
त्यजुनि आपली कवच कुंडले ।
सूर्यसुताने ब्रीद राखले ।
तत्त्वनिष्ठ ना यमासि हरले ।
सांभाळा पदवीची वस्त्रे, माते माझा मार्ग भला ।
देशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.