सेना समरांगणी रंगली तुझे पवाडे गात्
ध्वम, उध्वस्तक साथ् , समेला तोफांची बरसात् ।
लोक बुडबुडे शोधत होते ।
मुक्या मनाने उधळायातें ।
वीरश्रीने भरता रव ते ।
फुटती आकाशांत् । समेला तोफांची बरसात् ॥१॥
शत्रु भारताने ओळखला ।
नेम साधला प्रहार केला ।
आघाताने होय रिपुला ।
कारुण्याची रात् । समेला तोफांची बरसात् ॥२॥
श्रवणाने रणदेव रंगला ।
विराम आला आरोहाला ।
पडे यवनिका ! नेता भुलला ।
रिपुच्या जंजाळात् । समेला तोफांची बरसात् ॥३॥
आम्ही सैनिक ठाकलो खडे ।
पुनरपि गाण्या तुझे पवाडे ।
स्फोटांचे वाजवूं चौघडे ।
शत्रूच्या शिबिरांत् । समेला तोफांची बरसात् ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.