सेतूवरुनि दोराच्या धिंग्रा स्वर्पथ चालतां ॥
मुक्तिचा मार्ग देशाच्या सांगे सूत्रांत भारता ॥
क्रांतिनायक सूत्रे ती करी मुद्रित, फैलवी- ।
वृत्तपत्रांतुनी, गीता झाली ती क्रांतिची नवी ॥
सेवेसाठी हिंदुभूमिच्या, करी मृत्युला मी पाचारण ।
पुण्यभूवरी त्याच करो हा पुनरपि आत्मा देहा धारण ।
देशा अर्पण हे आत्मार्पण ॥धृ०॥
मान्य मला... इंग्रजी सांडले रक्त मीच त्या दिनीं ।
प्रतिशोधाची संकेतात्मक होती इच्छा मनी ।
देशभक्त मारले तुम्हीं या बसुनी सत्तासनी ।
आणि पाशवी बळें धाडले कितीक निष्कानीं ।
उठलो मी एकटा, स्वयंभू, रंगविले हे एकाकी रण ।
देशा अर्पण हे आत्मार्पण ॥१॥
राष्ट्रा कोण्या सत्ता ठेवी दाबुनि धारेवरी ।
स्वत्वासाठी अविरत राही आयोधन तोवरी ।
निरस्त्र माझा देश ठेवला, खुले युद्व ना करी ।
म्हणुनि योजला बेत, पाहुनी अंधारी शर्वरी ।
साधाया आघात अचानक, प्रशाल केले मी समरांगण ।
देशा अर्पण हे आत्मार्पण ॥२॥
हिंदू मी, पुत्र मी भूमिचा, माझी ही भावना ।
शत्रूचा आघात भूवरी, ईश्वर अवहेलना ।
नच मी धीमान्, जतन करी मी दुबळ्या तैशा तना ।
अर्पाया तिज रुधिरावाचुनि मजपाशीं तीर्थ ना ।
श्रीरामाची, श्रीकृष्णाची पूजा ही, मी धर्मपरायण ।
देशा अर्पण हे आत्मार्पण ॥३॥
स्वातंत्र्याचे समर अखंडित आव्हानिल शासना ।
शिकणे आहे अम्हां, भूपुढे प्राणाचे मोल ना ।
वेदीवर मी उभा, धडा तो शिकवायाते जनां ।
खोल रुजोनी सुफलित होवो माझी आराधना ।
रक्ताने लिहिल्या पानाचे भूय: भूय: घडो संस्करण ।
देशा अर्पण हे आत्मार्पण ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.