तो सलूनवाला मोडलेला वेळ भरुन काढण्याच्या तयारीस लागला. त्यानें आपल्या नोकरास सांगितलें, “जा, आणि त्या यादीवरच्या गृहस्थांस बोलावून आण.” परंतु ती यादी सापडेना. एक छोकरा म्हणाला, “ती यादी मी त्या टेबलावर ठेविली होती.” सलूनवाला संतापून म्हणाला. “त्या मघाच्या विक्षिप्त माणसानें तोच कागद लिहावयास घेतला असें दिसत. शाबास राव ! स्वत: डोयी न करता गेले आणि माझी १०/१२ गिर्‍हाईकें पण गेलीं. शिवाय मी वेळेवर बरोबर काम करीत नाहीं हा बभ्रा होईल व माझें नांव बद्दू होईल तें निराळेंच. काय करावें दुर्दैव झालें.”

त्या सलूनवाल्याचें दोन दमड्यांचे नुकसान झालें. परंतु जगाचें नुकसान फार झालें असतें. व्हिक्टर ह्यूगोस तो कागद तेथें न सांपडता तर फ्रेंच वाङ्मयास ललामभूत होणारी एक सुंदर कविता नष्ट झाली असती. तो कागद मिळाला म्हणून ती अपूर्व प्रतिभेची कविता ह्यूगोस लिहितां आली.

स्वावलंबन
पैगंबर महंमदाचा उद्योगावर फार कटाक्ष. ज्या ज्या वेळेस कोणी एकादा भिकारी त्यांना आढळे, त्या त्या वेळेस ते त्याला कोणत्या तरी उद्योगास लावीत. एक दिवस महंमद स्वस्थ बसले होते. त्या वेळेस एका माणसानें येऊन त्यांच्याजवळ भीक मागितली. महंमदानीं त्या मनुष्याकडे नीट पाहिलें. तो मनुष्य धट्टाकट्टा होता. हा भिकारी सशक्त आहे व त्यानें काम केलें पाहिजे असें मनांत आणून पैगंबर त्यास म्हणाले, “काय रे, तुझ्या घरीं कांहींच वस्तु नाहीं का ?”

भिकारी :- खरोखरच माझ्या घरीं कांही नाहीं; विष घेण्यास पै नाहीं, फांस लावून घेण्यास दोरी नाहीं.

पैगंबर :-  विष घेण्याची, फांस लावण्याची वेळ दूर आहे. दोन हात व दोन पाय असतां विषाची गोष्ट कशास रे बोलतोस ? तुझ्याजवळ कांही नाहीं म्हणतोस, तर काय रे, तूं रात्रीं कशावर निजतोस, पाणी कशानें पितोस, बोल.

भिकारी :-  मी एका मोठ्या सतरंजीवर निजतों; पाणी पिण्याचा एक लांकडी पेला आहे.

पैगंबर :-  जा तर; ती सतरंजी व तो पेला मजकडे घेऊन ये.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel