जैना मैना गैहैना जीवना लखाची ।
पांचजणी कोण कोण आवडीची ? ॥धृ०॥
आपण उभयतां बनकळी डाळिंबीची । रात्र ही हवहवाई दारूची ।
पंचारतीला होई आज्ञा स्वामीची उठा, बघा मौज होळीची ।
न्यारे न्यारा नखरा बनू जणू यकच गठी ॥१॥
सरपाटील तुम्ही जुमेदार अंबीर । मज न कळे याच्यावर ।
काय पांघरू मी ? नेसूं कोणचें चीर ? अस्सल नकल बरोबर ।
ताडपत्री मी पांघरेन कपाळभर ।
गाठी द्याया होइल उशीर, मला शोभले कीं साखरेची गाठी ॥२॥
जैना मुखरणी चवघीजणी नव्हा पुढें, नका जाऊं, उभे रहा ।
बिरबडुद्याचे लोक झुकले, मागें पहा । झोक पाहून करिती हाय हाय ।
माझ्या मनांत हा । पुष्पे नऊ दाहा ।
मारूतीरायाला वाहा । होळी पुजाया झाली एकच दाटी ॥३॥
वाजत गाजत होळीला पोळी लागली । उभयता ज्योत रेखली ।
गांठ शेल्याची नारीनें सोडली । पति मोहरे, मागें चालली ।
नासीकर बुवाची आज्ञा झाली । बाजू द्या थापर गेली (?) ।
सगनभाऊ म्हणे, देव भक्ताच्या भेटी । जशी तूपसाखरेची गाठी ।
नागपंचमीस नाग पुजाया एकटी । होळी पुजणार बोले मिठी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel