तुम्ही फुल गुलाब गुलचगन गेंद माझे । कर प्रीती जघन्यामधिं डंका हा वाजे ॥धृ०॥

आज आडपडद्याचे कांहीं तरी बोलत जा ॥ तारुण्यपण जाईल मग हो पहाल मजा । छाती र नी मो गे द घ्या होईल हे जा (?) थिर होऊन सावरून बसते पाहा मौजा । तुम्ही कोंदणं मी हिरकणी हो रंग ताजा । चहुंकडे पाहतां, या शेजारीं निजा । पाहुं पाहुं डोळा आज शिणले माझे ॥१॥

पुतळीला कसा हो, बसा हो या जवळी । भरपुर बागामधिं जाई फुलली पिवळी । आवडिनें मला घ्या मांडीवर जवळी । चोचल्या नका, छातीसी मला कवळी । रुत घटका येईल म्हणे राजसबाळी । शरिराची मोट कर, मी चाफ्याची कळी । नित उठुन कां मी बोलुं भाग्य माझें ॥२॥

बरें वरकांतीचें बोलतां हो सजणा । ताजवा हातीं घ्या मी भरते वजना । चंदन मलयागिरी सुवासिक सुखसजणा । पहा कांति माझी आज घासुन पहा ना । घरिं बसल्या अमृत आलें, कां रस प्या ना ? । दुर्बळास धन सांपडलें असें जाणा । उत्तर आज दे उसरलें भाग्य माझें ॥३॥

शुभ्र चांदण्यामधिं उभे जरा राहूं । उभयतां पेहरावा आज उत्तर लाऊं । सांगेन तशी वर्तणुक मज दावूं । करंगळ्या उभयतां धरा हो रंग पाहूं । असे बोलतांच धरधरला माझा जीवूं । भोगा लवकर आज सजणा सुख दाऊं । रामा म्हणे, कर आज शरीर दान तुझें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel