ध्यास तुझी आस, धरली कास, मन उदास, जरा ह्रदयीं धरा ।
कधिं याल माझ्या माहालीं ? दिल खुशाल करा ॥धृ०॥
काय चुकी झाली ? पदरीं घाला, मी स्नेहाची भुकेली ।
धरिन शेला, तुम्ही परस्त्रीच्या माहालीं ।
काय गेला, या दिसून आल्या चाली ।
तरमळे जीव, शरीर घाय झाली लाही, आतां कांहीं धीर धरा ॥१॥
तप्त शरीर झालें तुला पाहतां म्या हारप्तना केलें (?) ।
अंत पाहा ममतेचे मारून भाले ।
कुठें जाता म्यां फार प्रेत्न केले ।
तुम्ही तरी नटबाट, करिन थाट, धरिन वाट जरा पलंगी बसा रे ॥२॥
तुझ्या जीवासाठीं खोरी सेऊनी, उभी द्वारीं थाट करूनी ।
आज न्हाले, जाऊ मंदिरांत सदनीं ।
करूं मौजा आज दोघे आनंदानीं ।
करूनी अंगसंग उडवी रग, तू पतंग, जरा पलंगीं ठरा ॥३॥
प्रीत उभयताची असू द्यावी, माझी आण गळ्याची ।
मज व्हावी भाऊ सगनच्या गुणाची ।
प्रसंगास ध्यायी मजा हवी, रामा गाई, नवी चाल शिरा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.