कधिं बागांत चलाल ? । नेसन शालू, नखरा पहाल ॥धृ०॥

तुमच्या गळीं मी पडले । लाडक्यावाणी पदीं जडले । इष्कानें मी अडले । लोभ करा, नेत्र चढले । काय अपराध घडले ? । हौस पुरवा, आज सांपडले । मज लालडीचे लाल । तुम्ही तरी हातीं धरल्याची लाज ठिवाल ॥१॥

चवघीजणीचा थाट । येते अहो लाजून नटबाट । कां करितां बोभाट ? । कांता तुमची मी पहाते वाट । तुम्ही तरी नटबाट । एकमेकींचा पहा घाट । आज करिते जीव तुम्हांला बहाल । बसा शेजारीं पांघरुनी शाल ॥२॥

दुसरीसी एकांत । करतां पाहाते जळते मनांत । मजपेक्षां पाहण्यांत । नाहिं कुणि दुसरी या हो जनांत । अशा तरुणपणांत । भोग द्या, लाजूं नका मनां । गेंद गुलाल पहाल । सख्या तुम्ही लुटवा नव्या नवतीचा माल ॥३॥

नारीनें पदरीं धरतां आली रंगबहारी । बागामधिं स्वारी । नेली कांता घरबारी । चवभवत्या नारी । मधिं खेळतात गिरधारी । गाइ रामा नवी चाल । करुनि दया बक्षिस द्या हो माझे लाल ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel