उठ चातुरा, उभी भिजले द्वारीं ।
नाहीं बोलतां रात्र चालली सारी ॥धृ०॥

पायी पैंजण वाजती रुणझुण । येळ गस्तीचे पारे रे झाले दोन ।
कांहीं बोलतां लोक येती धावोन । रात काळोखी, मला पडेना चैन ।

तो भ्रतार निजला रे पलंगावरी ॥१॥
सारा शृंगार भिजुनी झाला नास । कुंकु पुसुनिया, भिजले रे माझे केस ।
शेला बारिक चिकटला अंगास । हात कापती, मुंग्या आल्या पायास ।

तो भ्रतार रागें भरेल तरी ॥२॥
हातीं तबक घेउनि उभी कामिण । काडी कुलुप आसरे माझी सजण ।
बाबू सवाई रंग तंग मस्तान । रंग सालंगर जाणेल मनींची खुण ।

ते प्रीतीची लाउनि तकमक दोरी ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel