आम्ही आलों तुला पाह्यला, मुखडा दाऊं । नको तिंदा लाजत जाऊं ॥धृ०॥
दैवानसार तुझी आमची ग पडली गाठ । शनवारीं पहिली भेट ॥ अधीं मुखडा दाउनी मागें फिरविलीस पाठ । पुढें गेलीस नीट नीट । खुणविलीस पाणीवठयावरी बोलुनी दाट । तो मनांत राखुनी थाट । खाणखुण दुसर्‍यापासीं घेतलें नाऊ ॥१॥

खाणखुण ज्यापशीं पोचविली सारी । तो प्रियकर आमचा नारी । त्याचे आमुचे येकांतीं तुजपरभारी । भाषण जालें बुधवारीं । घेतली शपत वाहुनी आम्हांस विचारी । मग पडिलों अणिक विचारीं । भेटली समक्ष तूं पदर सरसाऊं ॥२॥

तूं आपुली केवळ, नोहेस परकी कोणी । हितगुज सांगाय कानीं । आमी आलों मासला नवा बगाया छानी । करतीस लाजल्यावाणी । लाविलेस जीवीं नेत्रांचे पटके दोनी । काळजांत पाणी पाणी । आम्ही दर्दी कराया गर्दी सरकुन येऊं ॥३॥

अशी भीड धरशील तर उपाय आमुचा नाहीं । केल्यापेक्षां भर पाही । आम्ही जरिपटक्याकडिले, तुं लगीसवाई । येकदांच फिरऊं द्वाई । कविराज आपा येशवंत ठाई ठाई । माहांसुर नौकेमधिं गाई । म्हणे हुसन छापुन ? करे वालीवर लाऊं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel