अगे अलबेले ! रूप तुझें किति वानूं ?
उगवला जसा भानू ॥धृ०॥
हतांत सोनीयाचे छिल्ले ।
मुखडयावर हळदीचे डिल्ले ।
खाउन माजूमीचे झिल्ले ।
दोन्ही जोबन बनले किल्ले ।
किल्लयावर कधिं होतिल हल्ले ।
उभेच नीट निबर, जरा नाहिं ढिल्ले ।
पाह्याला बिसनीसे महले ।
कोटयावधि पतींचे भल्ले ।
अघाव जाणे (ज्याणे) रुपये दिल्हे ।
इतुक्यालाही इल्ले बिल्ले ।
खाउनिया शिर कल्ले खुल्ले ।
तपस्वियाणें तप मोकल्ले ।
साधूचें साधूपण गेले ।
अतीरथी हे कुल नागवले ।
अस्त्रिच्या पाईं हजारों मेले ।
साखर वाटिति पल्ले पल्ले ॥१॥
मारि नैनांची भुरोड ।
अलम उभी रस्ता करोड ।
गुल बशहरामध्यें येकचि अरोड (ओरड) ।
त्याहून मला लागली भिरोड ।
मी विषयाचा पक्का दरोड (दरोडेखोर) ।
म्हातारपणीं ज्वानीची परोड ।
अतां प्रीतीची घाली फरोड ।
मग विषयाची नरडी मुरोड ॥२॥
गोरिगोमटी मुखावर मुद्रा ।
लाउनिया हरिद्रा ।
नथ शोभे नाकिंच्या छिद्रा ।
दूर करी अमुच्या विषयदरिद्रा ।
हतभर जर साडीचा पद्रा ।
वारा न लागे जिचिया पद्रा ।
अवंतराच्या दैवीं भद्रा ।
फंदी अनंताचे कवितेला जन हे भुकेले ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel