एकदा एक साधू नदीवर स्नानासाठी गेला होता स्नान झाल्यावर त्याने सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी घेतले त्यामध्ये एक विंचू होता त्याने त्या साधूला डंख मारला साधूने त्याला पाण्यात अलगद सोडून दिले पुन्हा ओंजळीत अर्घ्य देण्यासाठी पाणी घेतल्यावर त्यात तो विंचू आला त्याने साधूला पुन्हा डंख मारला असे अनेक वेळा झाले हे पाहून दुसऱ्या एकाने विचारले की महाराज तुम्ही त्या विंचूला मारत का नाही त्यावर साधू म्हणाला की जर विंचू त्यांचा दुष्टपणा सोडू शकत नाही तर मी तरी माझा चांगुलपणा का सोडावा
यावर एखादा म्हणेल की साधू मूर्ख आहे त्याने जशास तसे वर्तन केले पाहिजे होते हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे कोण बरोबर कोण चूक काही लोकांचे चांगले किंवा वाईट वर्तन आकलनापलीकडील असते ज्याची त्याची धारणा दुसरे काय विशिष्ट सामाजिक चौकटीत जरी काही योग्य व काही अयोग्य असे असले तरीअंतिम सत्याच्या दृष्टीने सर्वच बरोबर असे काही जण म्हणतात एकाच गोष्टीकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन असू शकतात अापण सर्वांचा आदर केला पाहिजे