युद्ध ,ज्वालामुखी उद्रेक ,भूकंप, जलप्रलय ,इत्यादी नैसर्गिक किंवा पर्यावरण नाश ,मर्यादित साधन संपत्तीचा हवा तसा वापर इ.,मानवनिर्मित भौतिक संकटाबद्दल मी बोलत नाही तर एका वेगळ्या संकटाबद्दल मला बोलावयाचे आहे .आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही वाईट असत्य अन्याय मार्गाचा अवलंब केला तरी हरकत नाही किंबहुना तो योग्यच होय अशा प्रकारची धारणा निर्माण करणे अशा प्रकारचे हे संकट आहे .समजा क्षणभर गृहीत धरले की हेतू खूप चांगला आहे परंतु जर अयोग्य मार्गांचा अवलंब केला तर ते कितपत योग्य ठरेल .ब्रेन वॉशिंग करून मनाची रचना अशी बदलावयाची की कितीही क्रूर कृत्य करण्याला मनुष्य सहज तयार होईल।अशा प्रकारे तरुण हाताशी धरून, त्यांची मनोरचना बदलून, वाटेल ते घातक कृत्य करण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे. फॅसिझम  कम्युनिझम नक्षलवाद माओवाद मुस्लिम देशांतील निरनिराळे  अतिरेकी गट तथाकथित हिंदू अतिरेकी हे केवळ प्रचंड प्रमाणात हत्या करतात एवढेच नव्हे तर असे एक तत्त्वज्ञान  निर्माण करतात की त्यांच्या मताप्रमाणे जे ध्येय  उज्ज्वल मंगल व योग्य आहे त्यासाठी कितीही निरपराध लोकांचे शिरकाण करण्यास काहीही हरकत नाही त्यातून पुण्यच संपादन होईल .अश्या प्रकारच्या तत्त्वज्ञानामुळे व्यक्ती  व व्यक्तींचे गट क्षणार्धात स्वत:ला संपवण्यास तयार होतात.या कल्पनांवरील हल्ल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रक्तपात होत आहे .पूर्वी सत्ता संपत्ती मिळवणेसाठी रक्तपात केला जाई .आता मनोरचनेत बदल करून कल्पनांवर हल्ला करून ते साध्य केले जात आहे. कोवळी तरुण मुले त्या तथाकथित  उच्च  मंगल ध्येयासाठी स्वत:ला व इतरांना संपवण्यास कचरत नाहीत .

जर यात बदल घडवून आणावयाचा असेल तर एका धारणे ऐवजी दुसरी धारणा निर्माण करणे हा योग्य मार्ग ठरणार नाही असे मला वाटते .आपण पुन्हा तीच चूक करू  .व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे .व्यक्तीला मनोरचना ,संस्कार ,त्यातून निर्माण होणारी धारणा ,त्यातून येणारी प्रेरणा, या  सर्वाचा उलगडा जेव्हा होईल तेव्हा आपोआपच तो मूलत: बदलेल. हा बदल ही नव्याची नांदी असेल .प्रत्येक व्यक्तीचे समजातून झालेले  मूलगामी परिवर्तन हेच सर्वांचे उत्तर असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
प्रभाकर पटवर्धन

प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to विचारतरंग


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
पैलतीराच्या गोष्टी
कल्पनारम्य कथा भाग १
लोकभ्रमाच्या दंतकथा
खुनाची वेळ
कथा: निर्णय
गावांतल्या गजाली