अष्टांगिक मार्गाचें स्पष्टीकरण
ह्या आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक् दृष्टि ही पहिली पायरी आहे. सम्यक् दृष्टि म्हणजे चार आर्यसत्यांचें यथार्थ ज्ञान. जगामध्ये दुःख भरलें आहे. तें मनुष्यजातीच्या तीव्र तृष्णेमुळे उत्पन्न झालें, त्या तृष्णेचा क्षय केला असतां सर्वांना शांति मिळणों शक्य आहे. आणि परस्परांशीं कायावाचामनेंकरून सदाचाराने, सत्याने, प्रमाने आणि कळकळीने वागणें, हा कार्य अष्टांगिक मार्ग त्या शांतीचा मार्ग आहे. अशी सम्यक् दृष्टि लोकांत उद्भवली नाही, तर अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या पायीं होणारे तंटेबखेडे थांबावयाचे नाहीत, आणि जगाला शांति मिळावयाची नाही.
आपलें ऐश्वर्य आणि सत्ता वाढविण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर त्यापासून त्याची आणि इतरांची सारखीच हानि होणार आहे. यासाठी कामोपभोगांत बद्ध न होण्याचा, इतरांवर पूर्ण-मैत्री करण्याचा, आणि इतरांच्या सुखसमाधानांत भर घालण्याचा शुद्ध संकल्प बाळगणें योग्य आहे.
खोटें भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड, इत्यादि असद्वाणीच्या योगें समाजाची घडी बिघडते, व तंटेबखेडे उद्भवून ते हिंसेला कारणीभूत होतात म्हणून सत्य, परस्पराचें सख्य साधणारें, प्रिय आणि मित भाषण करणें योग्य आहे. यालाच सम्यक् वाचा म्हणतात.
प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादि कर्मे कायेने आचरलीं, तर त्यापासून समाजांत मोठे अनर्थ उत्पन्न होतील. यास्तव प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादिक कर्मांपासून अलिप्त राहून, लोकांचें कल्याण होईल अशींच कायकर्मे आचरलीं पाहिजेत. यालाच सम्यक् कर्मान्त म्हणतात.
सम्यक् आजीव म्हणजे समाजाला अपाय होणार नाही अशा रीतीने आपली उपजीविका करणें. उदाहरणार्थ, गृहस्थाने मद्यविक्रय, जनावरांची देवघेव, इत्यादि व्यवसाय करतां कामा नये. यांपासून समाजाला मोठा त्रास होतो, हें उघड आहे. असे व्यवसाय वर्ज्य करून शुद्ध आणि सरळ व्यवहाराने आपली उपजीविका करणें, यालाच सम्यक् आजीव म्हणतात.
जे वाईट विचार मनांत आले नसतील त्यांना मनांत येण्यास सवड न देणें, जे वाईट विचार मनांत आले असतील त्यांचा नाश करणें, जे सुविचार मनांत उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणें, आणि जे सुविचार मनांत उद्भवले असतील ते वाढवून पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करणें, या चार मानसिक प्रयत्नांना सम्यक् व्यायाम म्हणतात. (शारिरीक व्यायामाशीं याचा संबंध नाही.)
शरीर अपवित्र पदार्थांचें बनलें आहे, का विवेक जागृत ठेवणें, शरीरांतील सुखदुःखादि वेदनांचें वारंवार अवलोकन करणें, स्वचित्ताचे अवलोकन करणें आणि इंद्रियें व त्यांचे विषय यांपासून कोणतीं बंधनें उत्पन्न होतात आणि त्यांचा नाश कसा करतां येतो इत्यादि मनोधर्मांचा नीट विचार करणें, याला सम्यक् स्मृति म्हणतात.
आपल्या शरीरावर, मृतशरीरावर, मैत्री करुणादिक मनोवृत्तींवर किंवा पृथ्वी, आप, तेज, इत्यादिक पदार्थांवर चित्त एकाग्र करून चार ध्यानें संपादन करणें याला सम्यक्-समाधि म्हणतात.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ह्या सर्व पदार्थांवर ध्यानें कशीं संपादतां येतात, याचें विवरण 'समाधिमार्गां'त केलें आहे.

दोन अंतांला न जातां या मध्यम मार्गाची भावना केली पाहिजे. पहिला अन्त म्हणजे कामोपभोगांत सुख मानणें. त्याला हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह (हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो) हीं पांच विशेषणें जोडलीं आहेत. मनुष्यजाति दारिद्रयांत आणि अज्ञानांत खितपत पडली असतां आपण मौजमजेंत आनंद मानणें यासारखी हीन गोष्ट कोणती ? हा अन्त ग्राम्य म्हणजे गांवढळ लोकांचा आहे. तो सामान्य लोकांचा आहे. आर्यांना (धीरवीरांना) शोभण्याजोगा नाही आणि तो अनर्थकारक आहे. दुसरा अन्त देहदण्डन करणें हा. त्याला हीन आणि ग्राम्य हीं विशेषणें लावलीं नाहींत. पण तो दुःखकारक आहे. धीरवीरांना शोभण्यासारखा नाही आणि अनर्थावह आहे (दुक्खो अनरियो अनत्थसंहितो). अष्टांगिक मार्गाचीं सर्व अंगें हे दोन अन्त वर्ज्य करतात.
उदाहरणार्थ, खावें, प्यावें, मजा करावी ही चैनी लोकांची दृष्टि, आणि उपोषणादिक व्रतांनी देह झिजवावा ही तपस्व्यांची दृष्टि. यांच्या मधली दृष्टि म्हटली म्हणजे चार आर्यसत्यांचें ज्ञान. याप्रमाणें बाकीच्या अंगांची देखील मध्यवर्तिता जाणावी.*

* चार आर्यसत्यांची माहिती 'बुद्ध, धर्म आणि संघ' या पुस्तकाच्या तिसर्या परिशिष्टांत (पृ. ९४-९९) दिली आहे, ती देखील पाहावी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.