वसंता उठला. त्यानें शौचमुखमार्जन केलें.

वेदपुरुष : वसंता, चल मंदिरात जाऊ.

वसंता : घाटावर किती गर्दी .

वेदपुरुष : देवधर्म, स्नानसंध्या अजून आहे.

वसंता : हे सारे निष्पाप असतील का ?

वेदपुरुष
: त्यांनी संध्येंत तर आतां तसे म्हटले.

वसंता : परंतु  हे तशी ग्वाह देतील का ?

वेदपुरुष : एकदा शंकरानी माणसाचें रूप घेतले व गंगेवर गेले. ''मी संकल्प सांगतो, मी संकल्प सांगतो'' अशी त्यांच्याभोवतीं गर्दी झाली. भगवान शंकर म्हणाले, ''ज्याला वाटत असेल कीं मी निष्पाप आहें, त्यानें मला संकल्प सांगावा. तुम्ही रोज गंगेत स्थान करतां. गंगा पापं शशी तापं वगैरे म्हणतां स्थानसंध्या करतां. पातक कोठे उरले आतां ? पहा, ज्याला वाटत असेल त्यानेंच संकल्प सांगावा. पाप्याचा संकल्प मला कशाला ? मला स्वत: पापाचें कमी नाही. पाप्याचा संकल्प मीही सोडीन. पुण्यवंतानें सागितलेला संकल्प मला पाहिजे आहे का कोणी ?'' वसंता! भराभर सारे निघून गेले. दुसरीकडे संकल्प सांगण्यासाठी गेले. शंकरांच्या शेजारीं कोणीही उभे राहिलें नाही.

वसंता
: कैलासावर घरे बांधण्याची जरुर राहिली नाहीं त्यांना. निश्चित झाले ते. पुण्यवंत होऊन कैलासाची पायरी कोणीहि चढणार नाही.

वेदपुरुष
: ती बघ देवळाकडे गर्दी चालली आहे. कुजबुज सुरू आहे. पोलीसहिं जात आहेंत. चल लौकर .

वसंता
: चला खूपच तोबा उडाला आहे. मंदिराचे आवार भरले आहे. आपण सूक्ष्मरूप घेऊन पोळींवर बसू .

वेदपुरुष : बरे.

पुजारी
: हें मूल कोणाचें मी तरी काय सांगूं ?

पोलीस
: तुम्हीं केव्हां पाहिलें ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel