झाडू : काय दादा मांगू ?

स. गृ. : संकोचूं नको, माग.
झाडू : चार आणे द्या.
स. गृ. : हे आठ आणे घे. खरेंच घे.
वसंता : त्या झाडूवाल्याचे डोळे भरून आले. आहेत पहा. घळघळले त्याचे ते अश्रू. कां बरें तो रडत आहे ?

वेदपुरुष : अश्रूंत तुमच्या समाजांतील सर्वं घोर अन्यायांचें प्रतिबिंब मला दिसत आहे. स्वच्छतेच्या स्वर्गात ठेवणार्‍या  झाडूबद्दल समाजाला जास्तींत जास्त किती सहानुभूति असूं शकेल हे ह्यानें मागितलेले चार आणे सांगत आहेत. समजा झाडूला जास्तीत जास्त सहानुभूतींचें फार तर चार आणे देईल !

वसंता : त्या झाडूवाल्याला एवढी सहानुभूति झेंपली नाही! उष्टें खरकट्याचा मालक तो! त्या आठ आण्यांतील सहानुभूतिनें तो दडपला गेला. तो पाझरला. एवढी आठ आण्यांची मला देणगी मिळूं शकते, याचें त्याला अपार आश्चर्य वाटलें! कल्पनातीत अशी करुणा त्याला वाटली. मला झाडूला आणि आठ आणे! जास्तींत जास्त म्हणून मी चार आणे भीत भीत मागितले. आणि हे आठ आणे देतात! हें सत्य आहे कीं स्वप्न आहे ? मी भूवर आहें का देवलोकीं आहें ? त्या झाडूच्या हृदयांतील मुके भाव कोण वाचील ? कोण काव्यांत रचील ? कोण कादबंरीत रंगवील ?

वेदपुरुष : ते मुके भाव समजण्याचीं इंद्रियें तुमच्या कलावंतांना अद्याप फुटावयाची आहेत. पोपटाला कंठ कुटला म्हणजे तो बोलतो. तुमच्या कलावंतांना हे झाडूवाल्यांचे अश्रू अजून दिसत नाहींत, ऐकूं येत नाहींत. मग त्या अश्रूंतील शतभाव समजणें तर दूरच राहिलें. वसंता : त्या कचर्‍या च्या पिंपाजवळ ती झाडूवाली आई काय करीत आहे ?  वेदपुरुष : शाळा-कॉलेजें बंद झालीं आहेत. कॉलेजमधील शिकणारे विद्यार्थी घरीं गेले आहेत. त्यांच्या खोलींतील स्टेशनरी त्या पिपांत येऊन पडली आहे. झाडूवाली गोळा करीत आहे. वसंता : तें तर पुस्तक दिसत आहे. तेंहि उकिरडयावर ?

वेदपुरुष : हीं पुस्तकें परीक्षेपुरंतींच असतात! विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षणाबद्दल किती प्रेम आहे, हें पुस्तकांना ते किती किंमत देतात, त्यावरून समजून येईल. आणि तें पडलेलें पुस्तक आहे ना, तशा पुस्तकांना पाक्षिक पुस्तकें म्हणतात. परीक्षेच्या आधीं दहापंधरा दिवस गरम गरम अशीं हीं पुस्तकें तयार होतात.

वसंता : परीक्षेसाठी नोटा. होय ना ?

वेदपुरुष : विद्यार्थ्यांजवळून पैशांच्या नोटा भराभर घेऊन ह्या पंधरा दिवस टिकणार्‍या  नोटा त्यांना देण्यांत येत असतात! मी अमर असा एखादा ग्रंथ लिहीन व भारताचें नांव दिगंत नेईन असें या आचार्यांना वाटत नसतें. त्यांना ज्ञानदेव नको आहे. त्यांना वित्तादेव पाहिजे आहे. परीक्षा झाली कीं मुलें उपहासानें त्या त्या नोटा देणारांचीं नांवें तुच्छतेनें उच्चारून हीं नोटांची पुस्तकें गटारांत फेंकतात व म्हणतात ''जा बेटयांनो उकिरडयावर !''

वसंता : त्या बाईनें किती सामान कचर्‍याच्या ढिगांतून काढलें बघा! बाटल्या आहेत, डब्या आहेत, वर्तमानपत्रांची रद्दी आहे, हजामतीची पातीं आहेत, टांचण्यांचे कागद आहेत, वह्या आहेत. हें काय, ती बाई घाबरलीशी ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to सोन्यामारुति


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
गावांतल्या गजाली
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय