'' मनापं मे भन्ते संपन्नवरसूकरमंसं, तं मे भगवा पटिग्गण्हातु अनकम्पं उपादाया ति। पटिग्गहेसि भगवा अनुकम्पं उपादाया ति।''

'भदन्त, उत्तम डुकराचे उत्कृष्ट रीतीने शिजवून तयार केलेलें हें मांस आहे, तें माझ्यावर कृपा करून भगवन्ताने घ्यावें. भगवंताने कृपा करून तें मांस घेतलें.''

जैन श्रमणांचा मांसाहार

इतर श्रमणसंप्रदायात जे अत्यंन्त तपस्वी होत त्यांत प्रामुख्याने जैनांची गणना होत असे. असें असतां जैनसंप्रदायांतील श्रमणमांसाहार करीत होते, असें आचारांग सूत्रांतील खालील उतार्‍यावरून दिसून येईल-

''से भिक्खू वा भिवखुणी वा सेज्जं पुण जाणेज्जा बहुअट्ठियंमंसं वा, मच्छं वा बहुकंटकं, अस्मिं खलु पडिगाहितंसि अप्पे सिया भोयणजाए बहुउज्झियधम्मिए। तहप्पगारं बहुअट्ठियं वा मंसं, मच्छं वा बहुकंटकं, लाभेवि संते णो पडिगाहेज्जा। से भिक्खू वा भिक्खुणी वा गाहावइकुलं पिंडवायपडियाए अणुपविट्ठे समाणे परो बहुअट्ठिएण मंसेण मच्छेण अवणिमंतेज्जा, आउसंतो समणा अभिकंखसि बहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्तए? एयप्पगारं णिग्घोसं सोच्चा णिसम्म से पुव्वभेव आलाएज्जा, आउसोत्ति वा भइणीत्ति वा णो खलु मे कप्पइ वहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्तए, अभिकंखसि से दाउं जावइयं तावइयं पोग्गलं दलयाहि मा अट्ठियाइं । से सेवं वदंतस्स परो अभिहट्टु अंतोपडिग्गहगंसि बहुअट्ठियं मंसं परिभाएत्ता णिहट्टु दलएज्जा, तहप्पगांर पडिग्गहणं परहत्थंसि वा परपायंसि वा अफासुयं अणेसणिज्जं लाभे वि संते णो पडिगाहेज्जा। से आहच्च पडिगाहिए सिया तं णोहित्ति वएज्जा, अणोवत्ति वएज्जा। से त्तमायाय एगंतमवक्कमेज्जा। अवक्क्मेत्ता अहेआरामंसि वा अहेउवस्सयंसि वा अप्पंडए जाव संतणए मंसगं मच्छगं भोच्चा अट्ठियाइं कंटए गहाय से त्तमायाए एगंतमवक्क्मेज्जा। अवक्कमेत्ता अहेज्झामथंडिलंसि वा अट्ठिरासिंसि वा किट्ठरासिंसि वा तुसरासिंसि वा गोमयरासिंसि वा अण्णयरंसि वा तहप्पगारंसि थंडिलंसि पडिलेहिय पडिलेहिय पमज्जिय पमज्जिय तओ संजयामेव पमज्जिय पमज्जिय परिट्ठवेज्जा।''

'पुनरपि तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी फार हाडें असलेलें मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर जाणील की, यांत खाण्याचा पदार्थ कमी व टाकण्याचा जास्त आहे. अशा प्रकारचें पुष्कळ हाडें असलेलें मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर तो त्याने घेऊं नये. तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी गृहस्थाच्या घरीं भिक्षेसाठी गेला किंवा गेली असतां गृहस्थ म्हणेल, आयुष्यमान् श्रमणा, हें पुष्कळ हाडें असलेलें मांस घेण्याची तुझी इच्छा आहे काय? अशा प्रकारचें भाषण ऐकून पूर्वीच त्याने म्हणावें, आयुष्यमान, किंवा (बाई असेल तर) भगिनी, हें फार हाडें असलेलें मांस घेणें मला योग्य नाही. जर तुझी इच्छा असेल, तर फक्त मांस तेवढें दे, हाडें देऊं नकोस. असे म्हणत असतांही जर तो गृहस्थ आग्रहाने देण्यास प्रवृत्त झाला, तर तें अयोग्य समजून घेऊं नये. त्याने तें पात्रांत टाकलें, तर तें एका बाजूला घेऊन जावें आणि आरामात किंवा उपाश्रयांत प्राण्यांचीं अंडीं तुरळक असतील अशा ठिकाणीं बसून मांस आणि मासा तेवढा खाऊन हाडें व काटे घेऊन एका बाजूला जावें. तेथे जाऊन भाजलेल्या जमिनीवर, हाडांच्या राशीवर, गंजलेल्या लोखंडाच्या जुन्या तुकडयांच्या राशीवर तुसाच्या राशीवर, वाळलेल्या शेणाच्या राशीवर किंवा अशाच प्रकारच्या दुसर्‍या स्थंडिलावर (उंचवटयावर) जागा चांगल्या रीतीने साफसूफ करून तीं हाडे किंवा ते काटे संयमपूर्वक त्या ठिकाणीं ठेवून द्यावे.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel