एकदां शाळेंत परीक्षा होती. नामदेवानें एक मुलाला गणितांचे उत्तर विचारलें. नामदेवाचें उत्तर बरोबर होतें. परंतु घरी आल्यावर नामदेवाच्या मनाला ती गोष्ट झोंबली. आपण असत्य गोष्ट केली. काहींतरी शिक्षा स्वत:ला केली पाहिजे असें त्याला वाटलें. त्यानें तापलेल्या कंदिलावर आपले सुंदर मनगट ठेवलें. त्यानें मनगट भाजून घेतले. त्यावर पांढरी स्वच्छ पट्टी त्यानें बांधून ठेवली. दुस-या दिवशी नामदेव गणितशिक्षकाकडे गेला व त्यांना त्याने सर्व हकीकत सांगितली माझे मित्र गणित चूक द्या वाटेल तर मी स्वत:ला शिक्षाहि करून घेतली आहे,” असे सद्गदित होऊन ते म्हणाला.
“नामदेव, तू वेडा आहेस. असा होते की भाजून घ्यावा. विवेक करणें. संयम राखणें ही गोष्ट शीक बिचा-या शरिराला का कष्ट?” असे शिक्षक म्हणाले.
“नामदेव! हाताला रे काय लागले?” स्वामीनी विचारलें.
“कांही कांही,” तो म्हणाला.
“बागेंत का करताना का लागले? दगडबिगड नाही ना लागला? बधू दे मला,” असे म्हणून स्वामी त्याची जखम पाहूं लागले.
“काय रे हे? भाजला वाटतें हात?” स्वामीनीं विचारलें.
“ती माझ्या हाताला मी शिक्षा केली आहे,” नामदेव खाली “मान घालून म्हणाला.
“फुले वाढवणा-या झाडांना पाणी घालणा-या, सुंदर चित्रे काढणा-या, बांसरी वाजवणा-या हाताला कां बरे शिक्षा?” स्वामीनीं विचारलें.
“मी असत्य गोष्ट केली म्हणून, वर्गांत दुस-या मुलास मी गणिताचे उत्तर विचारलें. मला मागून वाईट वाटलें. आठवण राहावी म्हणून ही शिक्षा मी केली आहे. पुन्हा खोटें करताना हा डाग मला दिसेल,” नामदेव म्हणाला.
स्वामींनी नामदेवाकडे करूणेने व प्रेमाने पाहिलें. दोघांनी एकमेकांकडे पाहिलें. दोघे दोन दिशांना निघून गेले.
रघुनाथ, नामदेव ज्याप्रमाणे जीवनाचा अर्थ समजू लागले, त्याचप्रमाणे यशवंतहि जीवनाची किमत समजू लागला.
यशवंताच्या पूर्वीच्या जीवनांत व आतांच्या जीवनांत जमीनअस्मानाचा फरत दिसून येत होता. यशवंत एका श्रीमंत जहागीरादाराचा भाऊ होता. लहानपणी यशवंत शाळेत जाई, त्या वेळेस एखाद्या राजपुत्राप्रमाणे सजून जाई. अंगांत रेशमी कपडे, डोक्याला भरजरी टोपी, पायांत बूट! एक गडी त्याला उचलून खांद्यावर घेई, एक गडी त्याचें पाटीदप्तर घेई! शाळेंत यशवंत कोणाशी मिसळत नसे. इतर लहान मुलांबरोबर खेळत नसे. कपडे मळतील अशी त्याला भीति वाटे.
जरीची टोपी मातीत पडेल. अशी त्याला भिति वाटे. त्याची श्रीमंती भूमातेच्या मांडीपासून त्याला दूर ठेवी. मुलाला रंगरूप देणारी धूळ-त्या धुळींत श्रीमतीमुळे यशवंत खेळू शकत नसे. भूमाता त्याला हाक मारी, परंतु तो ओ देत नसे.
यशवंताच्या घरी केवढें गाईचें खिल्लार होते. परंतु गाईच्या वासराबरोबर त्याला वागडता येत नसे. गाईच्या मृदु, मऊ अंगांना त्याला हात लावता येत नसे. तो घरी दिवाणखान्यांत बसे. पाटावरून ताटावर व ताटावरून पाटाव एवढेंच काय ते त्याला माहीत. जगांत असून तो जगापासून दूर होता. गाईगुरांत, फुलामुलांत, शेतमळ्यांत असूनहि त्यांपासून तो दूर होता. तो एकप्रकारे अस्पृश्य होता.