इतक्यात कोकिळेचा आवाज आला. सारखा आवाज येत राहिला होता. स्वामी कूऊ, कूऊ करूं लागले. रघुनाथ पण कूऊ करू लागला. ती कोकिळा ओरडावयाची थांबली.

“तुम्ही वेडावल्यामुळे कोकिळा थांबली,” भिका म्हणाला

“कलेचे विबंडन ख-या कलावंताला कसे सहन होईल? स्वामी म्हणाले.

“कुऊ, कुऊ कसा उत्कट आवाज असतो! जणु तिचें हृदयच ओरडत असते,” नामदेव म्हणाला.

“ती म्हणते वसंत ऋतु आला. रानें, वनें फुलली नवीन पल्ल्व फुटले, नवीन मोहोर आले. सृष्टीचे वैभव आलें. परंतु भारताचे वैभव कधी येईल? भारताचें भाग्य कधी फुलणार, कधी लाखों खेडीपाडी भरभराटणार? भारतांतील लोकांच्या जीवनांत सुखासमाधानाचा वसंत केव्हा येणार? हा त्या “कुऊंत” अर्थ आहे असें कधी कधी मला वाटते!” स्वामी म्हणाले.
काळोख पडू लागला. सारी मंडळी गांवांत आली. भिका आपल्या घरीं गेली. जानकूहि गेली. स्वामी, रघुनाथ, नामदेव यांची जेवणें झाली.

“वेणू, तू कां नाही आमच्याबरोबर आलीस?” स्वामींनी विचारले.

“घरीं काम होतें. आईला मदत नको का? दळायचे होतें, पाणी आणायचें होते,” वेणू म्हणाली.

“तुला गाणीं येतात का वेणू?” स्वामीनीं विचारलें.

“हो, रघुनाथभाऊनें मला आश्रमभजनावली आणू न दिली आहे. शिवाय “गाडी धीरे धीरे हांक” वगैरे गाणीं उतरुनहि त्यानें दिलीं आहेत,” वेणू म्हणाली.

“प्रार्थनेच्या वेळेस तू पद म्हणशील?” स्वामींनी विचारलें.

“हो, म्हणेन. मी चांगलेसें आठवून ठेवीन हां,” वेणू म्हणाली.

“हो, ती तेंच म्हणणार होतों,” नामदेव म्हणाला.

“गांवांतील कांही मंडळीसहि मी बोलावलें आहे. स्वामी दोन शब्द सांगतील,” रघुनाथ म्हणाला.

“काय रे सांगू मी नेहमी?” स्वामी म्हणाले.

“या खेड्यांतील लोकांना कोण काय सांगतो? जें सांगाल तें नवीनच आहे. तुम्हाला विचारासाठी भुकेलेल्या या लोकांना पाहून दया नाही येत?” रघुनाथनें विचारले.

स्वामी एकदम गंभीर झाले.

“रघुनाथ! मंदिरांत बैठक घातली आहे. चलायचे ना?” भिकानें येऊन म्हटलें.

“हो, चला. वेणू चल,” स्वामीनीं हांक मारली.

गांवातील प्रमुख लोक येऊन बसले होते. स्वामींनी सर्वांना वंदन केले. गांवांतील तरुणहि आले होते. रघुनाथही आई, भिकाची आई आणि आणखी दोनचार स्त्रिया आंत बसल्या होत्या.

‘स्थिरावला समाधींत स्थितप्रज्ञ कसा असे|
कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे, फिरे कसा||


गंभीर प्रार्थना सुरु झाली. नंतर वेणूनें सुंदर पद म्हटलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel