५ प्रश्नोत्तरें

[ शेतकरी, कामकरी, विद्यार्थी यांचे वर्ग घेतांना अनेक प्रश्न निघतात.  ती प्रश्नोत्तरें खेडयापाडयांतील जनतेला कळलीं पाहिजेत.  म्हणजे त्यांना पुष्कळ गोष्टींचा उलगड़ा होईल. ]

प्रश्न :--  हैदराबादचा सत्याग्रह तेथील काँग्रेसने का थांबविला?
उत्तर :--  सर्व ठिकाणचा सत्याग्रह तूर्त थांबवावा असा सल्ला महात्माजींनी दिला.  सर्वांनी ती ऐकली.  महात्माजींना असें वाटत असेल कीं लोकांनी आपली शक्ति सांठवून ठेवावी.  आजच दमून जाल तर उद्या फेडरेशनचा प्रचंड लढा सुरू होईल तेव्हा कदाचित् स्वस्थ बसाल.  शिवाय संस्थानांत प्रचार नाहीं.  महात्माजींनी खेडयापाडयांतून विधायक काम सुरू करा असा सल्ला दिला.  विधायक कामाबरोबर राजकारण जातें.  खेडयापाडयांतून आज जर प्रचार होईल तर ऊद्यां फेडरेशनचा अखिल भारतीय लढा सुरू झाला म्हणजे संस्थानांतील विधायक कामानें जागृत  झालेली प्रजाहि त्यांत हजारोंनी सामील होईल.

प्रश्न
:-- आर्यसमाज व हिंदुमहासभा यांत कोणता भेद आहे?
उत्तर :--  भेद वृत्तीचा आहे.  आर्यसमाजाचे ते थोर कार्यकर्ते काँग्रेसची टिंगल करीत नाहींत.  ते महात्माजींना पदोपदीं भेटतात, सल्ला घेतात.  ते काँग्रेसद्रोही नाहींत.  काँग्रेसची अखिल भारतीय जबाबदारी ते ओळखतात.  परंतु हिंदुमहासभेचें तसें नाही.  निदान आपल्या महाराष्ट्रांत तरी कां. नाहींशी करणें हा त्यांचा डावा आहे.

प्रश्न :-- परवां वाचलें खरें स्वातंत्र्यवीर सावकरांचे नाशिकच्या लोकांस पत्र, कीं आतां पुढच्या निवडणुकींत निदान महाराष्ट्रांत तरी आपण विजयी होऊं व प्रांतिक सत्ता जी काय आहे ती आपण काबीज करूं.  पुढच्या निवडणुकींत निदान त्यांना मिळेल का जय?        
उत्तर :-- मुंबई प्रांतांत गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक व मुंबई शहर असे भाग आहेत.  गुजराथ व कर्नाटक काँग्रेसचे उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीं.  मुंबईतहि काँग्रेसच निवडून येईल.  महाराष्ट्राचा प्रश्न राहिला.  महाराष्ट्रांत तुम्ही शेतकरी व कामकरी ज्याला मत द्याल त्याचा विजय होईल. 

प्रश्न :-- आम्ही का काँग्रेसशिवाय मत देऊं ?  काँग्रेस कशीहि असली तरी तीच आधार.  तिनें आम्हांला लिहावाचायला शिकवण्यासाठीं कंबर बांधली आहे.  दारू बंद करणार आहे.  कर्ज बिल आणीत आहे.  खंडक-याला संरक्षण देणार आहे.  तहशील कमी करणार आहेंत.  दोन आणे का होईना, कांही ठिकाणी सूट तिने यंदा दिली.  विहिरी, रस्ते यांना पैसे दिले.  अधिका-यांची घमेंड थोडी कमी झाली.  नदी-नाल्यांचें शेताला पाणी घेतलें तर पैसा नाहीं.  बारीक सारीक दोन वर्षांत किती गोष्टी.  आम्ही तिलाच मतें देऊं.  हिंदुमहासभा शेतकरी कामक-यांचे करील का कल्याण?
उत्तर :-- त्यांच्या बाजूच्या पत्रांवरून त्यांच्याविषयींचा अंदाज करावयाचा.  साधें खंडकरी बिल आणलें तरी केसरी सारखी पत्रें 'बोल्शेव्हिझम आला म्हणून बोंबलूं लागलीं.  जळगांव, मालेंगांव येथे सावकार व्यापारी यांच्या परिषदा भरल्या.  काँग्रेसचें कर्जबिल पसंत नाहीं.  म्हणतात काय आम्ही काँग्रेसला राजीनामा द्यायला लावूं.  हे मूठभर लुटारू लोक!  म्हणतात मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावूं.  या जमलेल्या लोकांत हिंदुमहासभावाले, वर्णाश्रमवाले सनातनी यांचा भरणा अधिक होता.  हिंदुमहासभेला अशांचा कळवळा असतो.  केसरीनें एकदां म्हणतात सांगितलें होतें कीं, सावकार, इनामदार, जमीनदार यांचे आम्ही.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel