आता आमच्या समोर एक प्रचंड मोठे मैदान पसरलेले दिसत होते. त्याला लागुनच एक भव्य असा किल्ला होता . या किल्ल्यात कितीतरी महात्मे , सिद्धपुरुष समाधी लावून बसलेले आम्ही पाहिले. त्यांच्या बाजूला असंख्य फळा -फुलांनी नटलेले कितीतरी वृक्ष आणि वेळ होते. त्याचप्रमाणे स्वच्छ पण्याचे झरेही झुळझुळ वाहत होते .
"हे कोणते स्थान आहे?" योगीराजांनी कुतूहलाने जटाधारी ब्राम्हचार्याला विचारले . "हा अर्जुनाने बांधलेला किल्ला आहे. मुनिश्रेष्ठ व्यासांच्या सांगण्यावरून अर्जुन या ठिकाणी तपश्चर्येसाठी आला होता ."ब्रम्हचारी म्हणाला .
नंतर त्यांनी अंगुली निर्देश करून तो ब्रम्हचारी पुढे म्हणाला , " हे जे पुरुष तुला दिसताहेत , ते सारे महाभारत काळापासून इथे समाधी लावून बसले आहेत "
त्याने सांगितलेली ती विलक्षण आश्चर्यकारक माहिती ऐकून योगीराज अतिशय थक्क झाले. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने त्या महापुरुषांना वंदन केले. नंतर त्यांनी काही काळ त्याच ठिकाणी राहण्याची इच्छा ब्र्म्हचाऱ्याजवळ व्यक्त केली; परंतु ब्रम्हचारी म्हणाला," ते मुळीच शक्य नाही . कारण इथे फक्त सिद्धपुरुषांना राहण्याची परवानगी आहे . वरील हकीकत अद्द्भुत असल्यामुळे ती कल्पित असावी असे वाटण्याचा संभाव आहे; परंतु ती पूर्णपणे सत्य असून ती सांगताना थोडीसुद्धा अतिशोयोक्ती कुठेही केलेली नाही .
हिमालय पर्वतावर अश्या प्रकारच्या सिध्द महात्म्यांची वस्ती असून त्यांचे दर्शन एखाद्याच भाग्यवंताला होऊ शकते. या सिद्धापुरुषांजवळ अनेक अद्द्भुत वनस्पती असून त्यांच्या सहाय्याने त्यांना कित्येक दिवस अन्नपाण्याशिवाय राहता येते. व अश्याप्रकारे शरीरधारणेची सोय झाल्यामुळे त्यांना दिवस समाधी लावता येते. काही यौगिक क्रियेने योग्यांना मृत्यूही टाळता येतो. त्यामुळे त्या किल्ल्यामध्ये महाभारतकालीन सिद्धपुरुष समाधी लावून बसलेले योगीराजांना दिसले, या हकिगतित निदान मलातरी अतिशयोक्ती वाटत नाही.
आता अश्याच प्रकारची आणखी एक अद्द्भुत विलक्षण हकीकत पाहू :
काही वर्षांपूर्वी महात्मा श्रीआनंद स्वामीजी महाराज (पूर्वाश्रमीचे श्रीखुशालचंद , संपादक 'मिलाप' ) हे देखील अश्या सिद्धापुरुषांच्या दर्शनासाठी कैलास व मानससरोवरच्या प्रदेशात गेले होते. त्या ठिकाणी त्यांना महत्प्रयासाने असे काही विलक्षण सिद्धपुरुष भेटले. त्यांच्या संबंधीची आश्चर्यकारक हकीकत त्यांनी एका भाषणात कथन केली होती . त्यावेळी ते म्हणाले.
" काही दिवसांपूर्वी मी कैलास पर्वत आणि मानससरोवर या स्थळांची यात्रा करून आलो श्रीकैलास व मानस सरोवर या ठिकाणी जायचे म्हणजे साक्षात मृत्यूशी खेळण्यासारखे आहे. त्या ठिकाणी इतके भयंकर बर्फ पडते, की तिथल्या बोचऱ्या थंडीत जीव नकोसा होतो. आम्ही ज्या वेळेस मानस सरोवर आणि गौरीकुंड येथे पोहोचलो, त्यावेळी तिथल्या भयानक गारठ्यामुळे आमच्या बरोबरच्या एकाही यात्रेकरूला स्नान करण्याचे धाडस झाले नाही; परंतु मी मात्र तश्या थंडीतही स्नान करण्याचे ठरविले. माझा तो विचार पाहून कित्येकांना हुडहुडी भरली.
माझे सहप्रवासी म्हणाले," स्वामीजी, कृपा करून असल्या थंडीत स्नान करू नका, कदाचित न्युमोनिया होऊन प्राणावर बेतेल. "
मी म्हणालो," या पवित्र स्थळी पार्वती मातेने, माझ्या गौरिमातेने स्नान केले आहे. तेव्हा मी काय वाटेल झाले तरी इथे स्नान करणारच ! मला इथे मरण आले तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही " असे म्हणून मी ते बर्फाचे कवच फोडून कमंडलू मध्ये पाणी भरले आणि ते खुशाल अंगावर घ्यायला सुरवात केली. माझे सारे शरीर बर्फासारखे थंडगार बनले. बराच वेळ मी जणू निष्प्राण अवस्थेत पडून होतो.
त्यानंतर अंगावर ब्लांकेट ओढून मी इथेच बसलो. त्यावेळी मी ब्राम्हनंदात डुंबत होतो. मनाला विलक्षण शांती वाटत होती. इतका अनुपमेय आनंद, इतके विलक्षण सुख मी आजवर कधीच अनुभवले न्हवते!.
तेवढ्यात गाईडने येउन मला गदागदा हलविले. त्यामुळे माझी समाधी भंग पावली. गाईडच्या या कृतीचा मला थोडासा रागच आला. मी त्याला म्हणालो," मी अनुपमेय सुखसागरात डुंबत असताना मला जागे करायची तुला कुठून दुर्बुद्धी सुचली?"
त्यावर गाईड अपराधी चेहरा करून म्हणाला," महाराज, आपण या अवस्थेत चांगले सहा-सात तास बसला होता. आता लवकरच काळोख पडू लागेल आणि बर्फ पडायला सुरवात होईल तुम्हाला इथेच सोडून गेलो असतो तर कदाचित…."
"….मी अंगावर बर्फ पडून मेलो असतो. असंच न? पण मित्रा, त्या ब्राम्हनंदापुढे मला मृत्युचीदेखील तमा वाटली नसती."
"पण महाराज, तुम्हाला सुरक्षित आणण्याची जबाबदारी मला नको का पार पाडायला?…." गाईड नम्र स्वरात म्हणाला. त्याचे म्हणणेही चुकीचे न्हवते.
मी मुकाट्याने उठलो व त्याच्याबरोबर चालू लागलो. तेवढ्यात आकाशातून बर्फ पडायला सुरवात झालीच ! आणि थोड्याच वेळात पांढऱ्या शुभ्र बर्फाने सारा भूप्रदेश चमकू लागला.
"… पुढे एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमयप्रदेशात फिरता फिरता मला एक अद्द्भुत दिव्य स्थान नजरेस पडले. असे म्हणतात , की याच पवित्र स्थानी बसून भगवान शंकरांनी पार्वती देवीला उपदेश केला. त्या विवक्षित ठिकाणी पोचनेदेखील फार कठीण होते. मार्गात बर्फाचे निसरडे कडे होते; परंतु भगवान शंकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या पवित्र स्थळी जाण्याची विलक्षण ओढ होती. त्यामुळे 'देह जावो अथवा राहो ' या जिद्दीनेच मी निघालो होतो व मोठ्या कष्टाने तिथे जाऊन पोहोचलो होतो. इथे बसल्यावर मला अनुपमेय शांतीचा लाभ झाला आणि लवकरच माझी समाधी लागली.
बर्याच वेळाने मी समाधीतून जागा बर्फाचे कडे पार करून तेथून खाली उतरू लागलो. खाली येता येता एक मद्रासी साधू वाटेत बेशुध्द पडलेला माझ्या दृष्टीस पडला . तिथल्या विलक्षण थंडीमुळेच त्याची अशी अवस्था झाली होती; परंतु प्रयत्न करून पाहावा म्हणून 'गाईड'च्या सहाय्याने मी त्याला खाली आणले आणि अग्नी प्रज्वलित करून त्याचे सारे शरीर अक्षरश: 'तापवून' काढले. आम्हाला त्या ठिकाणी विस्तव करण्यासाठी लाकडे मिळणे कठीणच होते . कारण त्या बर्फमय प्रदेशात गवताची एक काडीदेखील उगवत न्हवती. त्यामुळे बकरीच्या वाळलेल्या लेंड्या जलुअनच विस्तव तयार करावा लागला. शरीर चांगले तापून निघाल्यावर तो मद्रासी साधू शुद्धीवर आला."
ते पुढे म्हणतात ," योगी प्रणवानंदजी महाराज या नावाच्या महान योग्याचे वास्तव्य मानस सरोवराच्या परिसरात सुमारे २०-२२ वर्षे आहे . मी ज्यावेळी त्यांना भेटलो, त्यावेळी त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला. पूर्वस्मृती चाळवली गेली आणि मी एकदम'सोमयाजी ' म्हणून हाक मारली.
ते नाव ऐकताच ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले वीस वर्षापूर्वी आम्ही लाहोरमध्ये एकत्र राहत होतो; त्यावेळी ते राजकारणात होते; परंतु त्या क्षेत्रात नीतिभ्रष्ट लोकांचाच भरणा असल्याचे दिसून आल्यावर त्यांचे मन विटले आणि राजकारण-संन्यास घेऊन ते तडक मानस सरोवरावर आले आणि त्यांनी योगाभ्यासास सुरवात केली. मी विचारले," स्वामीजी, आपण या योगाभ्यासात वीस वर्षात किती प्रगती केली ?"
त्यावर त्यांनी यौगिक क्रिया मला करून दाखविल्या. नंतर प्राणायाम करून थोडावेळ ते स्तब्ध बसले. आणि मग पाहता पाहता त्यांचे शरीर अधांतरी तरंगू लागले आणि थोड्याच वेळात ते पार खोलीच्या छताला जाऊन भिडले. मी आश्चर्याने थक्क होऊन वर पाहू लागलो. तेवढ्यात योगीमहाराज हळू हळू खाली आले.
त्यानंतर योगासंबंधी कित्येक गूढ गोष्टी मला समजावून सांगितल्या; परंतु त्या सर्वसामान्य मनुष्यापुढे दाखविण्यासारख्या नाहीत.
मानस सरोवराच्या यात्रेत मला आणखी एक महान सिध्द भेटले. त्याचे असे झाले ,
एके दिवशी संध्याकाळच्या वेळी आम्ही यात्रेकरू तंबूत बसून गप्पा मारीत होतो. मी सहज म्हणालो," या कैलास पर्वताच्या, अनेक देवदेवता आणि सिध्दपुरुषांचे वास्तव्य आहे असे जर आम्ही आजपर्यंत ऐकत आलो आहोत; परंतु इथे तर एकही सिद्धपुरुष आढळत नाही?"
माझे हे वाक्य पुरे होण्यापूर्वीच एक जटाधारी योगीराज माझ्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या सर्व शरीरावर भस्माचे आडवे उभे पट्टे दिसते होते. त्यांचे शरीर अतिशय भव्य आणि तेज:पुंज दिसत होते. मी लागलीच पुढे जाऊन त्यांना वंदन केले.
त्यावर त्यांनी मला घटत आलिंगन देऊन म्हंटले ," अहो, या कैलास पर्वतावर अनेक सिद्धपुरुष तपाचरण करीत आहेत . त्यांना भेटण्याची ज्यांना तीव्र इच्छा असते, त्यांना ते दर्शनही देतात ."
असे सांगून ते योगीमहाराज पाहता पाहता अदृश्यही झाले. हा एखादा भासच असावा असे मला सुरवातीला वाटले. म्हणून मी टोर्च आणून सगळीकडे तपासून पहिले; परंतु ते योगीराज पुन्हा काही माझ्या दृष्टीस पडले नाहीत; परंतु माझ्या कपड्यांवर मात्र भस्माचे डाग दिसत होते . याचाच अर्थ , तो ' भास ' नव्हता . ती अगदी शंभर टक्के वस्तुस्थिती होती .
दुसर्या दिवशी सकाळी मी माझ्या गाईड ला हाक मारून विचारले " इथे जवळपास कुणी सिद्धपुरुष राहतात का ? "
त्यावर शिशखम्भाजी ( गाईड च नाव ) होकारार्थी मान हलवीत म्हणाला ," महाराज , एक महान योगी येथे राहतात खरे ; परंतु ते माणसांना खून टाकीत असल्यामुळे त्यांच्या भेटीला कुणी जात नाही "
मी म्हणालो "मला त्यांनी खून टाकल तरी चालेल ; परंतु त्यांच्याकडे मला तू घेऊन चल . "
माझही हि विनंती ऐकताच त्याचे अंग शहारून आले . तो म्हणाला " महाराज , या बंड्याला दुसरी कोणतीही आज्ञा द्या , परंतु त्या नरमांसभक्षस योग्याकडे न्यायला सांगू नका "
मी म्हणालो "तू मला त्यांचे निवासस्थान दुरूनच दाखव . तू स्वतः तिथे ये असे मी म्हणताच नाही . "
त्यावर तो डोळे विस्फारित व खांदे उडवत म्हणाला ,"पहा बुवा ! तुम्ही आग्रह करता आहात म्हणून मी दुरूनच त्यांची फ़्गुह दाखवतो ; परंतु तुमचे काही बरे वाईट झाले तर जबाबदारी माझी नाही . "
"ठीक आहे . तू बिल्कुल काळजी करू नकोस ." मी म्हणालो
नाईलाजाने त माझ्या बरोबर गुहा दाखवण्यासाठी आला व त्याने दुरूनच बोट दाखवून म्हटले , " ते दोन भव्य दगड दिसताहेत न .. त्यांच्याच आतल्या गुहेत ते सिद्धपुरुष तपश्चर्या करत बसलेले आहेत. ते दगड तुम्ही बाजूला सारून आत जा . आणि त्यांचे दर्शन घ्या तुम्ही परत जिवंत बाहेर याल याची खात्री मी घेत नाही . "
शिशखम्बाजीचा निरोप घेऊन मी जवळजवळ पळतच त्या विविक्षित दगडान जवळ आलो .तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते .
मी महत्प्रयासाने ते दगड बाजूला केले आणि आत एक भव्य गुहा माझ्या दृष्टीस पडली .
माझा आनंद गगनात मावत नव्हता . मी त्याच आनंदात त्या गुहेत शिरलो . थोड्याच अंतरावर एक सिद्धपुरुष मंदी घालून बसलेले मला आढळले . हे काळ संध्याकाळी भेटलेलेच सिद्धपुरुष आहेत हे मी लागलीच ओळखले आणि त्यांना नम्रपणे लवून अभिवादन केले . मला पाहून योगीराजांना आनंद झालेला मला दिसला . त्यामुळे माझ्याही जीवात जीव आला . नंतर त्यांनी मला जवळ बोलावून माझही विचारपूस केली व माझ्याशी पुष्कळ विषयांवर चर्चा केली . त्यांचे सर्व विषयांतील अगाध ज्ञान व बोलण्यातील मृदुता व गोडवा पाहून मला आश्चर्याबरोबर आनंदही झाला .
त्यांचा निरोप घेताना मी विचारले . " महाराज , आपल्या भेटीस जी माणसे येतात त्यांना आपण खाऊन टाकता, असे मी जे माघा ऐकले ते खरे का ? "
त्यावर ते हसून म्हणाले , "अहो , माणसे खायला मी काय राक्षस आहे ? माणसांचा उपद्रव टाळण्यासाठी अशी काहीतरी भीती आम्हाला उत्पन्न करावी लागते ."
त्या योगीराजांनी सांगितलेल्या कित्येक गोष्टी मोठ्या गूढ व विलक्षण आहेत , परंतु त्या सर्वसामान्य मनुष्याजवळ प्रकट करण्यास त्यांची मनाई असल्यामुळे मी त्या सांगू शकत नाही .
मी बराच वेळ त्यांच्याशी नाना विषयावर चर्चा करीत होतो . तेवढ्यात ते मध्येच म्हणाले . " तुम्ही आता निघा . तुमचे मित्र तुम्हाला हाक मारीत आहेत ."
मी विचारले , " महाराज . ही गोष्ट आपल्याला इथे बसून कशी समजली ?"
त्यावर ते हसून म्हणाले . " काल संध्याकाळी इथे बसून मी जसे तुमचे संभाषण ऐकले व तुझा भ्रम पुरा करण्यासाठी तुला दर्शन दिले , अगदी तसाच ! भूत , भविष्य आणि वर्तमान कोणतीही घटना माझ्याकडून लपून राहू शकत नाही . इथे बसून इंग्लंड - अमेरिकेतील घटना आम्ही पाहू शकतो ."
त्या त्रिकालज्ञ महापुरुषाला मनोमन वंदन करून मी त्यांचा निरोप घेतला आणि त्या गुहेतून बाहेर पडलो . त्या वेळी बाहेर माझे मित्र संचित होऊन मला खरोखर मला हाक मारीत होते . "
श्री आनंद स्वामीजी पुढे म्हणतात , " माझ्या या दीर्घकाळच्या यात्रेत मला काही बौध्द साधू ही भेटले . हे साधू ' तामसिक सिद्ध 'असून ते कच्चे मांस खाऊन राहत असत . तेथे राहणारे लामा योगी मात्र मांसाहार अजिबात करीत नाहीत . त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या असून योगमार्गात त्यांनी अल्पावधीतच कल्पनातीत प्रगती केली आहे .
अशा एका लामा योग्याची व माझही सुदैवाने गाठ पडली ; परंतु आम्हा दोघांना एकमेकांची भाषा समजत नसल्यामुळे मी एका दुभाष्याला बोलावून घेतले ; परंतु अत्यंत पवित्र व गूढ अशा योगविद्येचॆ रहस्ये त्या अनधिकारी दुभाष्यासमोर प्रकट करण्यास तो योगी मुळीच तयार नव्हता .
त्यामुळे मी एका मौलिक चर्चेला मुकलो ; परंतु माझी ही जज्ञासा जाणून त्याने काही विलक्षण अद्भुत अशा यौगिक क्रिया मला करून दाखवल्या आणि शेवटी प्राणायामाच्या द्वारे आपले शरीर विशिष्ट प्रकारे फुगवून त्याने हृदयाजवळ वास करणाऱ्या अत्यंत तेजः पुंज अशा अंगुष्ठा एवढ्या जीवात्म्याचे मला दर्शन घडविले ! त्या दर्शनाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले . "
श्री आनंद स्वमिजीनसोबत घडलेल्या घटना हिमालयात सिद्धपुरुष अजूनही वास्तव्य करून आहेत याची ग्वाही देतात .
हृषीकेशपासून पुढे सर्व हिमायलभर अनेक सिद्धपुरुष व महान योगी राहतात . त्यांच्या भेटीची ज्यांना तीव्र तळमळ असेल त्यांना त्यांचे दर्शन निश्चित पणे होते यात तिळमात्र संशय नाही .
संदर्भ :- थोडे अद्भुत थोडे गूढ ( वि . के . फडके )
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.