आज कथा नाही किंवा अनुभव नाही तर एक थोडक्यात माहिती आहे बस.
प्रत्येक मनुष्य हा कल्पना विलास करतो या कल्पना विलासात न राहणारा मनुष्याच निराळाच. प्रत्येकाच्या कल्पना करण्याच्या या कल्पनेचे विश्व हे वेगळे कोणकोणत्या विचारात रमतो हे आपल्याला सांगताही येत नाही.
या कल्पनेच्या दुनियेत प्रत्येकजण आहे मग आयचे विश्व या कल्पनेच्या भराऱ्या या एकसारख्या आहेत? कधीही या असणार नाहीत म्हणून तर ज्योतिषशास्त्रातून मानसशास्त्राचा अभ्यास होतो.
सायाकिकता हा विषय म्हणूनच तर गूढ आणि गहन आहे. आपल्या मनाची उकल आपल्यालाच नाही. मला काय पाहिजे हे मलाच समाजात नाही अशी स्थिती आली कि ती मग तो गोंधळतो. इथे हि परिस्थिती येण्यास कारण हे लागते हि कारणे वेगळी. कारण कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. ती झालेली घटना त्या घटनेचा होणारा परिणाम यात मग भौगोलिक परिणाम व्याहारिक परिणाम आणि मानसिक परिणाम हे वेगवेगळेच राहतात.
एखादी घटना घडली कि तीच परिणाम सर्व बाजूने होणे हि गोष्ट तर कॉमनझाली पण हा परिणाम व्खाद्याच्या मनावर कोणत्या पद्धतीने होतो हा भाग इथे महत्त्वाचा राहतो. कारण घडणारी घटना हि पुन्हा पुन्हा घडते इथे नाविन्य हे क्वचितच असणार आहे. परिस्थिती नाविन्य आणि एखाद्याची मानसिकता यामध्ये त्या जातकाच्या जन्म कुंडलीतील योगाचा परिणाम असा सर्व बाजूने विचार होतो.
प्रश्न निर्माण होतो तो या मानसिक विचारंची स्थिती बदलते तसे या पृथ्वीतलावरील प्रत्येक जलाशयांच्या रंगाचीही स्थिती बदलते. अगदी समुद्राच्या पाण्याच्या रंगामध्ये जो बदल होतो तो आपल्यापासून शंभर प्रकाश वर्ष लांब असणाऱ्या कॅनोपास / अल्पज (अगस्ती, करीना, नौकातल ) या स्थिर तर्यामुळे बदलतो हे आपल्या ऋषी मुनींनी त्यावेळीच शोधून काढले आहे.
आपल्या जुन्या ग्रंथामधून यांचा उल्लेख आहेच अरुण याही नावाचा उल्लेख आपल्या ग्रंथांमधून आहे. आपण नेपच्यून या ग्रहाला अरुण असे म्हणतो. आजच्या या संशोधनानुसार या नेपच्यूनचा शोध जोहान यांनी १८४६या साली या शास्त्रज्ञाने लावला असे आपल्या अथ्यापुस्तकात नामुस आहे. पण आपण आपल्या जुन्या ग्रंथातील याचा उल्लेख मात्र आपले प्रगत लोक विसरतात हेच आपल्या भारतीयांचे दुर्भाग्य आहे.
दिवा स्वप्न मी पहाते
त्याच कल्पनेच्या दुनियेत
मी बेहोशीत राहते
त्या स्वप्नातल्या सत्यात
सारखी मी रंगते
त्याचभावनेचे माधुर्य
मी आज ओठी चाखते
अस्वस्थ मानाने मी बेहोष होते
त्याच दुनियेत मी तरंगत राहते
आणि त्याच स्वप्नाच्या ओढीची
मला नाश राहते
नेपच्यून हा ऋणत्वाचा स्त्री ग्रह आहे. हा भावनेचा कारक आहे. याचा संबंध आपण डोळ्यांपेक्षा मनाला दिला पाहिजे. मनामध्ये येणाऱ्या कल्पनेचा तो कारक आहे. अबोध उत्कंठा, अनामिक ओढ, प्रेम, नफरत, यांचा हा संगम आहे. हा भावनामध्ये गुंतून राहणारा आहे. स्वप्नाच्या दुनियेत राहणारा आहे.
अल्लड तरुणीला प्रेमाच्या भावनेत गुंतवून ठेवणारा आहे. प्रेमभांगाच्या कल्पनेने कासावीस करणारा आहे. मिलनाच्या ओढीने अस्वस्थ करणारा आहे. एखाद्या चिंतेने झोप ना लावणारा आहे. त्याच प्रमाणे आनंदाने बेहोशाही करणारा आहे.
आपल्या पासून शेकडो मैल दूर असणाऱ्या जिवलगाची आठवण करून देणारा आहे. त्या भवनाचा त्याच वेळी संदेश पोहचवणारा आहे. मनाला अहुवर गुंतवून ठेवणारा आहे. शुक्र हा कलेच्या गायनाचा कारक आहे. तसा नेपच्यून हाही याचा कारक आहे आणि तो यात गुंतवून ठेवाण्याचे कार्य करतो. तो अतिसंवेदनशील आहे त्यामुळे तंतू वाड्या हे ग्रहांच्या काराकात्वाखाली येतात.
लांबचे समुद्रमार्गाचे प्रवास तेल, धूर, विषारी औषधे रसायने भ्रामक समजुती, आल येणे किंवा स्वप्नात राहणे आळशी सुस्त स्वभाव काळजी करणे, गुंगी आणणारे पदार्थ, रोगाचे निदानात घोटाळे करणे हा अध्यात्माचा अनुभव देणारा आहे.कोनात्याहो चांगल्या वाईट गोष्टी समजण्याची शक्ती या ग्रहामुळे येते. टेलीपथी हि पद्धत तर याचा पाया आहे. अत्यंत संवेदनशील मन आणि त्याच अभ्यास फार सूक्ष्म करणे गरजेचे असते.या ग्रहांचा अभ्यास करताना मनाच्या गुंतागुंती सोडवणे हेच यांचे वैशिष्ट्य आहे. शुक्र हा प्रणयाचा कारक आहे. प्रत्यक्ष जोडीदाराबरोबर केलेला प्रणय हा शुक्राच्या अधिपत्याखाली येतो पण जोडीदाराशिवाय केला जाणारा प्रणयाचा अधिपती मात्र नेपच्यून आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.