संतांचा सहवास एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले- "देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा"? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर नदेता एका किटकाचा निर्देश करून सांगितले कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या किटकाला शोधत नरका पर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले- "सत्संगा चे काय फळ आहे तुला माहित आहे का?" कीटका ने त्यांचे कडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णा कडे आले म्हणाले देवा तो कीटक तर काही बोलल्या विनाच मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा. देवांनी नारदां चे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले "तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल." नारदमुनी त्या पोपटाचे पिला जवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचे कडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले. अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णा पाशी आले. म्हणाले "देवा आपलाल्या सांगायचे नसेल तर नका सांगू नका पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत - अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात" तेंव्हा देव त्यांना म्हणाले " त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तेपहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्या ला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल." दुखी अन्त: कारणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्या च्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला; त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले आणि ते तेथेच लुढकले. नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले "राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नारदांनी विचार केला आता पर्यंत कीटक पोपट व बछड्या चे मृत्यू ने माझ्यावर काही आपत्ती आली नाही पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात. तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमारा कडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले शआणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले- सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो ? प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात. आहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेंव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो ; नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला बछड्या चा देह प्राप्त झाला ; पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्या चा देह पडून सर्व देहा मध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले ; हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमा हि कळला. "नारायण नारायण" म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले "देवा जशी आपली लीला अगाध तशीच आपली समजावून देण्याची पद्धत हि दीव्य आहे " म्हणून मित्रांनो जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्या प्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म , कर्ण सर्वोश्रेष्ठ असुन ही त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात संगत कशी निवडायची विचार करावा-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


खुनी मांजर
झोंबडी पूल
वाड्याचे रहस्य
भूतकथा भाग १
सापळा
खुनी कोण ?- भाग तिसरा
मारीआजी Mari Aaji
हॅलोविन Halloween
भयकथांची मुण्डमाला
भय इथले संपत नाही…
मॄत्योर्माअमॄतं गमय