माफ करा वाचकांनो । भरपूर दिवस पागे वर कथा पोस्त झाल्या नाहीत . परीक्षा असल्यामुळे कथा post आम्हाला करता आल्या नाहीत . मागे २ वेळा मी कथा टाकेन असे सांगूनही कथा टाकली नव्हती याच मा भान आहे , दोन्ही वेळेस माझा net प्रोब्लेम झाला होता म्हणून कथा तक्ता नाही आल्या . त्याबद्दल क्षमस्व …… आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कथा , किस्से, गूढ आणि दैवी गोष्टी नियमित पोस्त केल्या जातील . …। - krishna desai //////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////// अनेक दिवसान पासून लोक page msg करत आहेत की bermuda triangle वर पोस्त टाक । म्हणून आजची ही पोस्त खास त्या वाचकान्साठीच ……. अमेरिकेच्या आग्नेय दिशेला अटलांटिक महासागरात असलेल हे एक गूढ स्थान bermuda triangle. Miami (Florida), San Juan (Puerto Rico) आणि Bermuda (a north-Atlantic island) ही ३ द्वीपे या त्रिकोणाचे ३ कोन . अस असल तरी bermuda याच नावाने या जागेला ओळखतात . bermuda triangle हे जगातील लोकांसाठी एक कुतूहल बनून राहीले आहे ते म्हणजे त्या स्थानात होणार्या घटनांमुळे . या स्थानात आल्यावर जहाजे आणि विमाने आश्चर्य रित्या गायब होतात मग कितीही ही शोध घेतला तरी जहाजे परत मिळत नाहीत . Florida आणि Puerto Rico च्या दक्षिणेकडे जहाजे गायब होण्याचे प्रकार अधिक घडत असत . याची उकल करण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रांनी केला . पण जहाजे गायब का होतात याचे उत्तर मिळाले नाही . १००० हून जास्त जहाजे आणि विमाने गेल्या ५०० वर्षात या त्रिकोण क्षेत्रात लुप्त झाली. हा प्रकार हाहा म्हणता अख्या जगाला माहित पडला . जागेवर बसून चकाट्या पिटनार्यांनी आपले तर्क जोडून अनेक अफवा पसरवायला सुरवात केली . कोणी म्हणी या जागेवर भूत आहे , कोणी म्हणे विशाल octopus या क्षेत्रातओच हि जहाजे बुडवत आहे वावरत आहे . २० व्या शतकात विमाने सुद्धा गायब व्हायला लागली . त्यातच २०व्या शतकात aliens आणि उडत्या तबकड्यांची प्रकरणे समोर आल्यावर हे खापर गरीब aliens वरच फोडण्यात आल. त्यातच भर म्हणून " अलिएन्स ओं इर्थ " " इर्थ इस इन डेंजर " असे आपल्या "दुनिया खतरे मी "," अलिएन्स का हमला "असे हिंदी news channels type बातम्या पसरवणारी वृत्तपत्रे तेव्हाही होतीच . जहाजे आणि विमाने गायब होण्यामागे मानवी हस्तक्षेप नव्हता , यांत्रिक बिघाड असण्याची शक्यताही नव्हती. विमाने आणि जहाजे गायब होत तेव्हा वातावरणात कोणताही बिघाड नसे . कोलंबस ने या प्रदेशावरून जाताना केलेल्या नोंदीत तो लिहितो की " मी आणि माझ्या साथीदारांनी या प्रदेशात विजांचे अनोखे खेळ बघितले . या प्रदेशात मला आगीचे लोळही दिसले" . जे की अन्य समुद्रात त्याला तरी कुठे आढळून आले नाहीत . विमान चालक परिस्थितीत बिघाड झाला कि संदेश पाठवत . अश्याच एका वैमानिकाने radio वर विमान गायब होण्या आधी संदेश असा … " आम्हाला काळात नाही आहे कि आम्ही कुठे येउन पोहोचलो आहोत … पाणी हिरव्या रंगाच आढळून येत आहे . यंत्रणेत बिघाड होत चालला आहे " अश्याच एका अधिकार्याने पाठवलेल्या संदेशाने तर या प्रकरणाची दिशाचाच बदलून टाकली " विमान कोणत्यातरी दुसर्या ग्रहावर पोहोचले आहे … " एकाएकी संपर्क तुटून जहाजे व विमाने गायब झाल्याची अनेक उदाहरणे आहेत . flight १९ … अमेरिकेच्या फ्लोरिडा या नाविक विमान तळावरून routine training session साठी उड्डाण केले . december १९४५ ला दुपारी उड्डाण केलेल्या विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि हे विमान गायब झाले . एकाएकी संपर्क तुटलेल्या या विमानाचा खूप वेळ वाट बघूनही परत येण्याची चिन्ह दिसत नाही म्हंटल्यावर २ विमाने त्याच्या शोधार्थ पाठवली . दोन्ही विमाने आणि फ्लोरिडा base एकमेकांच्या संपर्कात होती . पण अचानक एका विमानाचा संपर्क तुटला . आणि हे विमान सुद्धा bermuda त्रिकोणाच्या भक्षी पडले . इमानात इंधन खूप होते . त्यामुळे इंधन संपून विमान कोसळण्याची शक्यता कमीच होती . संपर्क तुटताना पायलट ने दिलेल्या माहिती नुसार त्यावेळी अचानक इंजिन बंद - चालू होत असल्याच त्याने Radio वर कळवले होत . आणि थोड्याच वेळात विमानाचा संपर्क तुटला . या दुर्घटनेत त्या विमानावर असलेले १४ जणही गायब झाले . flight DC ३ .। हे विमान फ्लोरिडाच्या दक्षिणेकडे फक्त ५० मैल दूर असताना रहस्यमय रित्या गायब झाले . C -५४ skymaster . या विमानाचा किस्सा अजून वेगळा आहे . skymster हे लाडखू विमान . याची यंत्रणा अद्ययावत होती . bermuda triangle मध्ये पोहोचताच त्याने base ला संदेश पाठवला . त्रिकोणात प्रवेश करताच क्षणी एक विजांचा कडकडात व वादळी परिस्थिती दिसत आहे. या ठिकाणी अचानक वातावरणात बदल दिसून येत आहे . त्रिकोणाच्या बाहेर वातावरण सौम्य आहे आणि त्रिकोणाच्या या भागात वादळी परिस्थिती । आणि एकेकी संपर्क तुटला …… ellen austin हा एक अमेरिकन नाविक होता . तो गलबत चालवत असे . त्रिकोणाच्या जवळून जात असता त्याला एक नाव अत्यंत वेगात जात असताल्याची आढळली . त्याने त्या बोट शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला . पण त्या बोट वर कोणीच नव्हते ….तरीही अत्यंत वेगात ती बोट समुद्रात फिरत होती . The USS Cyclops…। मार्च १९१८ मध्ये ही boat baltimore येथून निघाली . maryland , virginia करत तुच प्रवास चालू होता … एका गस्त घालणाऱ्या जहाजान virginia येथे ती दिसल्याच कळवळ होत . पण bermuda त्रिकोणात आल्यावर हि बोट या त्रिकोणाची शिकार झाली . काही लोकांच्या मते हि बोट कुवतीपेक्षा जास्त समान बाळगून होती . वादळात सापडली असल्याच तिची एवढ्या वजनासह बुण्याची शक्यताच जास्त होती .…. पण वादळी परिस्थिती तर त्या समयी रडार वर दिसत नव्हती . SS Marine Sulphur Queen। molten sulphur चा पुरवठा कण्यासाठी हि बोट वापरली गेली. या जहाजावर ३९ प्रवाशी होते . फ्लोरिडा नंतर हे जहाज रहस्यमय रित्या गायब झाले . जहाजावर काम करणाऱ्यान पैकी एकही प्रवासी वाचला नाहि. जहाज जिथून गायब झाले त्याच्या आजूबाजूला lifeboat व floating tyre सापडले … bermuda त्रिकोणात जहाजे ही वेगवेगळ्या स्थितीत हरवली होती . एकाच वातावरणात आणि एकाच प्रकारे हरवली गेल्याची ती आढळून आली नाहीत , त्यामुळे एकच गोष्ट या मागे असू शकते असा दावा करता येत नाही . या bermuda triangle चा सोक्ष मोक्ष लावायचे अनेकांनी ठरवले . त्यांनी या गोष्टीची उकल करणाऱ्या काही theory सांगितल्या . त्यातली एक theory अशी सांगते की … समुद्र तळाशी प्रचंड प्रमाणात असलेला methane gas पाण्याची घनता कमी करतो त्यामुळे मोठमोठाली जहाजे सुद्धा प्रचंड दगडासारखी समुद्र तळाशी पोहोचतात . हा गस सतत पाण्याबाहेर वर पृष्ठभागावर येत असतो . . पृष्ठभागावर आल्यावर हा काही अंतरावर जाऊन हवेत विरतो . या भागात जेव्हा विमाने पोहचतात तेव्हा हाच methane gas मुळे समुद्रावर उडणारी विमाने पेट घेऊन उद्धवस्त होतात . Electronic Fog,… या क्षेत्रात चुंबकीय बल मोठ्या प्रमाणावर आहे . त्यामुळे विद्युत ढग जे या प्रदेशात आल्यावर जहाजाला आणि विमानाला घेरून टाकतात . त्यामुळे उपकरणे अचानक बंद पडतात . त्यामुळे विमाने व जहाजे बंद पडून गायब होतात . काहिंनी या मागे परग्रहावरील शक्ती असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे . यामागे अनेक तर्क विरात्क लावले जात आहेत , पण सत्य अजूनही अनभिद्न्यच आहे . … //////////////////////////////////////////////////////////// उद्याच्या भागात "pyramids" अथवा "bermuda and aliens " यावर post टाकण्यात येईल …।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel