बराच काळ कष्टदायक प्रवास केल्यानंतर मी अखेर इंदूरला येऊन पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर मी दुसरीकडे कुठेही न उतरता थेट माझ्या सद्गुरूंच्याच घरीच गेलो. ते घरीच होते , मला पाहिल्यावर ते हसून म्हणाले," काय,सगळीकडे हिंडून शेवटी आमच्याकडेच आलास ना ?" मी ,"हो" म्हणालो. मी इतक्या ठिकाणी फिरलो हे त्यांना कसे समजले? मी चकित झालो व माझे मन त्यांच्याबद्दलच्या अपर श्रद्धेने भरून गेले. त्यानंतर त्यांनी माझ्या रोगाची सर्व हकीकत विचारून घेतली आणि ते आईच्या मायेने मला म्हणाले," मुळीच घाबरायचं नाही. तू मरत नाहीस. चांगला खडखडीत बरा होशील." एवढे सांगून ते आतल्या खोलीत गेले. ती त्यांची उपासनेची खोली होती . आत जाऊन त्यांनी तीर्थ आणि अंगारा आणला. तीर्थ त्यांनी मला प्यायला दिले आणि अंगारा माझ्या कपाळावर लावला. त्यानंतर ते हसून म्हणाले , " आता तू साफ बारा झालास ! आता अल्सर वगैरे काही नाही तुला . कशाची काळजी करायची नाही. समजल ? " त्यांनी एवढ सगळ पुनः पुन्हा सांगितले तरी माझा विश्वास कुठे बसत होता ? मी अडखळत म्हणालो ," पण महाराज ...." पुढचे विचारायचा धीर होईना . तेव्हा तेच म्हणाले , " बोल काय शंका आहे ; विचार .... " मी म्हणालो , "स्वामी मी आजवर एवढी औषधे घेतली पण एकानेही गुण आला नाही आणि तीर्थ - अंगार्याने.. " " त्याच्याशी तुला काय करायचं ? माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा . समजल ? " मी नुसतीच मान हलवली . कारण मनात शंकेची पाल अजून चुकचुकत होती . तेवढ्यात ते म्हणाले , " बरं, आज आमच्या इथेच जेवायचं . अगदी पोटभर . नंतर काय होत ते बघू आपण ! " पोटभर . जेवण्याच्या नुसत्या कल्पनेनेच मश्हे अंग शहारले . कारण पोटभर जेवण माझ्या नशिबातच नव्हते . पोटभर जेवल्यावर होणारी पोटदुखी , वांत्या .. ते लालभडक रक्त .. सारंआठवून अंगावर काटा आला ; परंतु सद्गुरूंच्या शब्दाबाहेर कसं जायचं ? मी याच गॊश्तॆच विचार करीत कोपर्यात बसून राहिलो . थोड्याच वेळात जेवण तयार असल्याची आतून सूचना आली व मी हातपाय तोंड धुवून आत स्वयंपाक घरात गेलो व भीत भीतच पाटावर बसलो . त्या दिवशी महाराजांच्या सूचनेवरून मुद्दामच तिखट सांजा करण्यात आला होता . महाराजांनी आग्रह करकरून मला जेवायला घातले . एवढे आकंठ जेवल्यावर आता लवकरच आपल्याला मळमळू लागले , मग वांती होईल ... कदाचित वांती बरोबर रक्तही पडेल .. चांगले ओंजळभर.. अशा रीतीने माझे हृदय धडधडत होते . मी मनातून अगदी अस्वस्थ होऊन गेलो होतो .परंतु केवढे आश्चर्य ! मला यांपैकी काहीच झाले नाही. एवढेच नव्हे तर माझा रोग त्या क्षणापासून जो पळाला तो कायमचाच ! माझी प्रकृती आता चांगली ठणठणीत आहे. मला कधी काळी इतका तापदायक अल्सुर होता हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही . " हे आश्चर्य कारक घटना घडल्यानंतर पुढे थोड्याच दिवसांनी श्रोत्रींच्या पत्नीचा दावा हात एकाएकी खांद्यापासून दुखू लागला . अनेक डॉक्टरी उपचार करूनही गुण येईना . शेवटी पुन्हा एकदा श्रोत्रीन्नी महाराजांना भेटण्याचे ठरवले . योगायोग असा, की थोड्याच दिवसात स्वतः महाराज कल्याणला शोत्रॆञ्च्य घरी आले .त्या वेळी पत्नीच्या हाताचा प्रश्न त्यांनी साहजिकच महाराजांपाशी काढला . त्याही वेळी महाराजांनी अंगारा मंत्रून श्रोत्रीन जवळ दिला व तो पत्नीच्या हाताला रोज लावण्यास सांगितले . आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसे करताच चार - सहा दिवसातच तो हात दुखायचा थांबला. हा केवळ त्या अङ्गर्यचच प्रभाव नव्हता का ? अंगार्यावरून या ठिकाणी आणखी एक सत्य घटनेची मला आठवण येते . तो प्रसंग फडक्यांनी स्वतःच अनुभवलेला आहे . एकदा ते त्यांच्या तीन चार वर्षाच्या लहान मुलाला तिन्ही सांजेच्या वेळी चुकून फिरावयास नेले . वास्तविक अशा वेळी लहान मुलांना मुलीच बाहेर नेऊ नये असे म्हणतात ; परंतु चूक झाली खरी आणि तिचे परिणामही त्यांना लगेच भोगावे लागले . मुलगा घरी आल्यावर शांतपणे झोपी गेली ; परंतु पंधरा वीस मिनिटातच तो दचकून जागा झाला व मोठमोठ्याने कळवळून रडावयास सुरवात केली . त्याला भूक लागली असेल असे वाटून त्यांनी दुध आणले ; परंतु त्याने ते उलथून टाकले . तेव्हा त्याचे पोट दुखत असेल असे समजून पोट शेकण्याचा प्रयत्न केला ; परंतु तो एक मिनिटही स्थिर राहीना .कडेवर घेतला तर तेथून अंग टाकू लागला . त्याने स्वतःचेच केस जोरजोरात ओढावयास सुरवात केली . रडून रडून तो लाल बुंद झाला . त्याचे रडणेही नेहमी पेक्षा वेगळ्या प्रकारचे व भीतीदायक वाटत होते . शेवटी हा काही वेगळा प्रकार आहे असे वाटून आमच्या वडिलांनी हळूच बाहेर जाऊन जवळच्या केतकर वैद्यांना बोलावून आणले . वैद्य केतकरांनी थोडक्यात माहिती विचारून घेतली व चिमुट भर राख घेऊन चिंतीत धरली व डोळे मिटून काही मंत्र म्हटला आणि तो अंगारा मुलाच्या कपाळाला लावला . आश्चर्याची गोष्ट म्हणजे , इतका वेळ रडून रडून आकांत करणारा तो मुलगा दोनच क्षणात शांत झोपी गेला . " कल्याण " या हिंदी मासिकातली ही सत्यकथा , एकदा एका गृहस्थाला एक असाध्य रोग जडला . अनेक औषधोपचार करूनही गुण येईना . शेवटी कुणा सत्पुरुषाच्या सांगण्यावरून त्याने स्वतःच दैवी उपाय करण्याचे ठरविले व त्याने भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेऊन ' हरिः शरणम ' या मंत्राचा एकाग्रतेने अव्याहत जप करण्यास सुरवात केली . आश्चर्य असे, की थोड्याच दिवसांत कोणतेही औषध न घेता केवळ श्रद्धेने जपलेल्या त्या प्रभावी मंत्राच्या सामर्थ्याने त्याचा रोग बरा झाला . मंत्र मध्ये अशा प्रकारचे विलक्षण सामर्थ्य असते हे कबूल केलेच पाहिजे . ' ॐ ह्रीं नमः ' हा असाच एक प्रभावी बीज मंत्र . योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या मंत्राचा विशिष्ट प्रभावी पद्धतीने सव्वा लक्ष जप झाला , कि प्रखर वाचा सिद्धी येते व अमृतदृष्टी प्राप्त होऊन रोग्यकदे केवळ पाहूनच त्याचा रोग नष्ट करण्याची शक्ती येते , दहा ते पंधरा हजार जप पूर्ण झाल्यावरच त्याच्या शक्तीचा अनुभव येऊ लागतो . कोणी किरकोळ आजारी असल्यास हा मात्र केवळ एकवीस वेळा जपून अंगावर लावल्यास त्याचा आजार बरा होतो . ताप , खोकला , विंचूदंश इत्यादींवर हा मंत्र फारच प्रभावी आहे ,अर्थात तो विशिष्ट पद्धतीने सव्वा लक्ष जपून अगोदर सिद्ध केला पाहिजे . या मंत्रात स्वतःचे व दुसर्यांचे कल्याण साधण्याची विलक्षण शक्ती असल्याने साधकांनी तो सिद्ध करून ठेवावा व त्याचा योग्य वेळी उपयोगही करावा . श्री आत्मानंद यांनी आपल्या ' अमृत तुषार ' या पुस्तकात या जापाबद्दल बरीच माहिती दिली आहे . ते लिहितात – ' ॐ ह्रीं नमः ' हा एक फार महत्वाचा असा बीजमंत्र आहे . त्यात हरी व हर अशा दोन्ही देवतांचा समावेश आहे . या मंत्राने तेज वाढते . स्वतःचे व दुसर्याचे कोणत्याही खेत्रात चांगले करण्याची शक्ती प्राप्त होते . याने स्वतःचे व दुसर्याचे आर्थिक पारमार्थिक कल्याण करता येते . रोग निवृत्ती , प्रपंचीक व दैवी संकटे यांचे परिमार्जन करता येते ; परंतु तो जप कसा करायचा व तो चालू असताना आचरण कसे ठेवायचे याला फार महत्व आहे . या जपणे ' स्वार्थ ' आणि ' परमार्थ ' दोन्ही साधता येतात . सव्वा लक्ष जप पूर्ण झाल्यावर वाचासिद्धी येते . नुसत्या पाहण्याने रोगमुक्ती होते . तो जप पुढील प्रमाणे - " शुभ चंद्र व शुभ नक्षत्र असून आपणास अनुकूल चंद्र असेल त्यादिवशी अथवा वर्ष प्रतिपदा , दसरा , अक्षयतृतीया , बलीप्रतिपदा , वैकुठ चतुर्दशी , राम नवमी , जन्माष्टमी अशा दिवशी या जपला सुरवात करावी . ' ॐ ह्रीं नमः ' हा एकाच जप पंधरा सेकंदात करावा , यापेक्षा अधिक वेळ लागला तरी चालेल . त्याचा प्रकार असा . ' ॐ ... ह्रीं... नमः ' म्हणजे ' ॐ ' म्हणून झाल्यावर तोच ' म ' चा उच्चार नाकातल्या नाकात गुंगवायचा. थोडा वेळ झाला म्हणजे त्याच श्वासात ह्रीं म्हणून त्यातील ' म ' चा त्याच प्रमाणे नाकात नाद गुंगवायचा व शेवटी नमः म्हणून संपवायचा . असे निदान पंधरा सेकंद लागले पाहिजेत . असे करताना भ्रुमध्यत अथवा छातीच्या खोबणीत ज्योती कल्पून तीवर ध्यान केंद्रित करावे , माळ सुरवातीला शुध्द स्फटिकाचीच वापरावी . असा जप एका मिनिटात चार वेळा होईल . अशा प्रकारे रोज स्नानानंतर किंवा रात्री शक्य तर दोन्ही वाला हातपाय धुवून १०८ जप करावा . एक लक्ष जप झाला म्हणजे पुरश्चरन होते , किंवा ग्रहणाच्या वेळी ग्रहण लागण्याच्या पूर्वी सुरवात करून ग्रहण संपल्यानंतर पूर्ण केले तर एक पुरश्चरण होते . जप सव्वा लक्ष पूर्ण झाला तरी रोज निदान एक माळ जपण्याची सवय कायम ठेवावी म्हणजे परकार्यात खर्च होईल त्याचा परत संचय होईल . दहा ते पंधरा हजार पूर्ण झाल्यावर त्याच्या शक्तीचा अनुभव येऊ लागतो . कोणी साधे आजारी असल्यास त्याला हा मंत्र २१ वेळा जपून रक्षा द्यावी , असे सकाळ - संध्याकाळ दोन - तीन दिवस करावे . औषधा वाचून रोग जाईल .त्याचप्रमाणे जसजशी जपसंख्या वाढत जाईल तसतसे स्वतःचे आत्मिक सामर्थ्य वाढत जाईल . ३५-४० हजार जप झाल्यावर वरील पद्धतीनेच साधारण असाध्य समजले जाणारे आजार किंवा संकटेसुद्धादूर होऊ लागतील . जप ५०-६० हजार झाल्यावर रक्षा मंत्रून ठेऊन ती परगावी पाठवली तरी उपयोग होत जाईल .७५ - ८० हजार जप झाला म्हणजे अगदी असाध्य समजले जाणारे रोगसुद्धा दुरुस्त होतील . एखाद्या रोग्याकडे जाण्याचा प्रसंग आल्यास अंतः करण पूर्वक जप करून त्याच्या अंगावरून , विशेषतः रोग्याच्या जागेवरून हात फिरवावा . असे दोन - चार वेळा केले म्हणजे निश्चित गुण येईल . ताप , खोकला , विंचूदंश वगिरे तर तत्काळ नाहीशे होतात ; परंतु आत्मविश्वास पूर्वक काम करावे . स्वतः जाने शक्य नसेल तेथे रक्षा पाठवावी व ती रोग्याच्या स्थानी व कपाळास लावण्यास सांगावे व पायात कालवून द्यावी .रक्षा निदान १०८ वेळा तरी जपलेली असावी . दिवसातून तीन वेळा प्रयोग करावा . सव्वा लक्ष पूर्ण झाल्यावर नुसता तोंडाने उच्चार जरी केला तरी रोग अथवा संकटे नाहीशी होतील ....." मंत्रा प्रमाणे नामात देखील असेच विलक्षण सामर्थ्य आहे ; परंतु त्याचा प्रत्यय येण्यास फार विलंब लागतो . कारण काही लक्ष किंवा कोटी जप झाल्याशिवाय अनुभव येत नाही. गुरुदेव रानड्यांना स्वतःला क्षयरोगाची भावना होती ; परंतु केवळ नामस्मरणाने त्यांने त्यापासून स्वतःचे रक्षण केले होते . गुरुदेव रानड्यांचीच या बाबतची एक आठवण .... गुरुदेवांना एकदा क्षयरोग आला . गुरुदेवांचे आध्यात्मिक सामर्थ्य त्यास ठाऊक असल्याने त्याने आपला क्षयरोग बरा करण्याची त्यांना प्रार्थना केली . तेव्हा गुरुदेवांनी त्यास फक्त ' रामनाम ' घेण्यास सांगितले . ते ऐकून तो गृहस्थ थोडा नाराज झाला व त्याने गुरुदेवांना विचारले ," गुरुदेव , केवळ रामनामाने माझा क्षयरोग कसा बरा होणार ? " त्यावर गुरुदेव हसून म्हणाले , " अहो , जे नाम भवरोग दूर करू शकते . ते क्षयरोग दूर करणार नाही का ? "
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel