महाराष्ट्राचा हा कुलाचार- महाराष्ट्राचा हा कुलधर्म ! महाराष्ट्राची हि उज्ज्वल परंपरा. खंडेरायाच्या जयजयकराची येथे गेली हजारो वर्षे चालत आलेली हि रीत. परचक्र येवो अथवा दुष्काळ पडो तिच्यात ना पडला कधी खंड. अखंड राहिलेली हि भक्ती. सामर्थ्य देणारी शक्तीपूजा ! कुलदैवत खंडोबा देवघर नाही असे घर महाराष्ट्रात सहसा आढळायचे नाही. त्या देवाघातर गणपती, विठ्ठल, महालक्ष्मी इत्यादी देवदेवातांबरोबरच खंडोबाचा टाक असतो. कुठे तो सोन्याचा, तर कुठे तो चांदीचा, तर कुठे तो तांब्या-पितळाचा असतो. तो कुठल्या धातूचा आहे याला महत्त्व नसून त्यावर कोरलेल्या खंडोबाच्या प्रतिमेला भाविकांच्या मनात स्थान आहे. त्या प्रतिमेवर पूजेच्या वेळी रोज भंडारा उधळण्यात येतो. भंडारा ! साधी हळद. खंडोबाला प्रिय असणारा हा पदार्थ त्या टाकावर उधळताना मनामनातून आवाज घुमत असतो, ' येळकोट-येळकोट-जय मल्हार !' महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे आणि पंथांचे, रावांचे आणि रंकांचे कुलदैवत खंडोबा आणि तो म्हणूनच खऱ्या अर्थाने आहे लोकदेव. मुळ कर्नाटकातला ' खंडोबा ' मूळ कर्नाटकातले. नंतर तो महाराष्ट्रात आला; पण हा येळकोट हणजे कोन ? ' येळू ' या कानडी शब्दचा अर्थ म्हणजे ' सात ' असून कोट म्हणजे ' कोटी. ' सात कोटी असा या शब्दाचा अर्थ. मल्हारी मार्तंडाचे सैन्य सात कोटी होते, यावरून त्याला ' येळकोट मल्हार ' संबोधिले जाऊ लागले. 'इला' म्हणजे 'पृथ्वी' आणि 'कोट' म्हणजे 'पूर्णपात्र'. "खंडेराया, शेतात भरपूर धान्य पिकू दे ! मी तुला पूर्णपात्र भारेऊन ते अर्पण करीन" असाही येळकोट शब्दाचा अर्थ लावला जातो. दैत्याचा निर्दालन करणारा मल्लहारी :- 'मैलार' हा 'मल्लारी' शब्दाचा अपभ्रंश असून 'मणी' आमी 'मल्ल' ता दोन राक्षसाना मारणारा तो 'मल्लहारी' म्हणजे 'मल्लारी' किंवा 'मल्लांना (दैत्यांना) मारणारा' असा त्याचा अर्थ आहे. 'चांगभले' हा शब्दही कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. 'चांगले,भले' अश्या अर्थाचा हा मराठीत आलेला आहे. कानडीत 'सांगू भलो' अशा प्रकारे हा घोष करतात. या दैवताची ' मल्लारी मार्तंड', 'खंडोबा', 'खंडेराय', 'म्हाळसाकांत', 'मार्तंड भैरव' इतकेच नव्हे, तर 'मल्लुखान', 'अजमखान' अशीहि नावे आहेत. 'मणी' आणि 'मल्ल' या दैत्यानाचा नयनात भगवान शंकरांनी मार्तंडाचा अवतार घेऊन केला. त्या अवतारात शंकरांनी जे खड्ग वापरले होते त्याचे नाव होते 'खांडा' आणि म्हणूनच तो खांडा धारण करणारा 'खंडोबा.' म्हाळसेचा पती म्हणून 'म्हाळसाकांत' यानावानेही तो विख्यात आहे. 'म्हल्हारी मार्तंड' किंवा 'मार्तंड भैरव' अशीही त्याची नवे आहेत 'मार्तंड' म्हणजे 'सूर्य.' दैत्यांचा संहार करण्याकरता भगवान शंकराने जे रूप घेतले होते ते 'भैरव' म्हणून ओळखले जाते. सूर्य भैरव आणि शंकर यांचे एकत्रित रूप म्हणजे 'मार्तंड भैरव'. गोमंतकातील 'सप्तकोटीश्वर' हे याचेच रुप ! या देवतेचे 'रवळनाथ' हे नाव प्रामुख्याने कोकणपट्टीत रूढ आहे. 'ज्योतिबा' हेही त्याचेच रूप आहे. 'अजमतखान' आणि 'मल्लुखान' हि नावे या देवतेला पडण्यासबंधीची आख्यायिका अशी सांगतात, कि औरंगजेबाने जेजूरीवर स्वारी करून तेथील मंदिर फोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खंडोबाने लक्षावधी भुंगे निर्माण केले व त्यांनी सैनिकांना सळो, कि पळो करून सोडले. फक्त एकदाच नव्हे, तर दोनदा. शेवटी औरंगजेबाने 'सोन्याचा भुंगा' तयार करून तो खंडोबाला अर्पण केला व त्याचे नाव 'अजमतखान' उर्फ 'मल्लुखान' असे ठेवले. अशा या दैवताची मंदिरे भारतात विविध ठिकाणी विविध स्वरुपात आढळतात. आपल्या महाराष्ट्रात, तर ती असंख्य आहेत. तेथे दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते अशी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आणि मध्य महाराष्ट्रात तब्बल २४५ स्थाने आहेत. या शिवाय काही स्थाने सांगायची झाली, तर त्यांची यादी दोनशेच्या घरात जाईल. या सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील 'जेजुरी' समजले जाते. बाराही महिन्यातील कोणत्याही दिवशी तेथे जा, भक्तगण भंडारा उधळून येळकोट मल्हाराचा गजर करताना दिसतातच. साहजिकच आपले कान आणि मन हा जयजयकार ऐकून अक्षरशः तृप्त होतात. गड जेजुरीच्या आसमंतात !एस.टी.ने पुणे शहर सोडल्यास हडपसर लागते. वाटेत जो घटा लागतो तो 'दिवेघाट'. खाली 'मस्तानी'चा तलाव पसरलेला दिसतो. श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशवे या रमणीय परिसरात मस्तानीसह जलक्रीडा करत असत. घात ओलांडला, कि उजवीकडे दूर अंतरावर ऐतिहासिक 'जाधवांची गते. पाथोपात येते सासवड. पुरंधर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण सरदार पुरंधारे इथलेच. बालाजी विश्वनाथ पेशव्यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. आचार्य अत्र्यांची हि जन्मभूमी ! संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानकाका यांची समाधी आहे. येथेच कर्हा नदीच्या काठावर वटेश्वर आणि संगमेश्वराची दोन अतिशय देखणी व दगडी बांधकामाची प्राचीन मंदिरे आहेत. सासवडपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे. सासवड आणि पुरंधर किल्ल्याच्या दरम्यान नारायनेश्वराचे सुबक मंदिर आहे. सासवड मागे टाकले कि जेजूरी. ती पुण्यापासून तब्बल ४८ किलोमीटर अंतरावर सून जेजुरीपासून १५ किलोमीटरवर अष्टविनायकातील श्रीक्षेत्र 'मोरगाव' आणि तिथून अवघ्या ५ किलोमीटरवर पांडवांची यज्ञभूमी 'पांडेश्वर' आहे. याच, आसमंतात पुढे १५ किलोमीटरवर भुलेश्वराचे अप्रतिम मंदिर आहे. पुरंदर, सासवड, जेजुरी, आणि भुलेश्वर हा भाग विस्तृत पठाराचा असून तेथून कऱ्हा नादी वाहते म्हणून या भूभागाला 'कऱ्हेचे पठार' असे नामाभिधान प्राप्त झाले. या परिसरातून स्वातंत्रवीर उमाजी नाईक याने जुलुमी ब्रिटीश सत्तेविरुद्ध रणशिंग फुकले; परंतु पुढे तो ब्रिटीशांच्या तावडीत सापडला आणि त्यांनी क्षणाचाही उसंत न घेता त्याला फासावर लटकावले; पण त्या स्थितीतही वीर उमाजी नाईक गर्जत होता . "येळकोट मल्हार ! येळकोट मल्हार !" पूर्वीची जेजेवाडी आत्ताची 'जेजुरी' ! असा हा जेजुरीचा आसमंत आणि कऱ्हा नदीचा परिसर आहे. सध्या जिथे जेजुरी आहे तेथून एक किलोमीटरवर जेजेवाडी नावाचे एक खेडे होते. कालौघात ते नामशेष झाले; पण जेजेवाडीलाच पुढे 'जेजुरी' म्हणण्यात येऊ लागले. जेजेवाडीच्या बाजूनेही गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत; परंतु त्या बाजूचा गडाचा दरवाजा आता बंद केला असल्याने त्याचा वापर नाही. त्या जुन्या जेजुरीत मारुतीचे मंदिर असून याला 'रोकडोबा' म्हणतात. याच परिसरात ३५ एकरात पेशव्यांनी बांधलेला अशाकोनी तलाव आहे; पण आज त्याचा बराच भाग बुजला आहे. त्याच्या पुढे 'मल्हारतीर्थ' नामक एक तलाव असून सातारच्या छत्रपतीनी तो बांधला आणि त्याच्या सभोवार नवसरीकरांनी सोपे बांधले होते. श्रीमंत होळकरांचे कुलदैवत खंडोबा होते. जेजुरीच्या उत्तरेला तुकोजीराव होळकरांनी एक तलाव बांधला न पुढे त्याच्या काठावर अहिल्यादेवींनी मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले. त्यासाठी त्याकाळी १८ लक्ष रुपये खर्च झाले होते आणि तेच पुढे जेजुरीकारांचे पाणीपुरवठा केंद्र झाले. अशी हि जुन्या व नव्या जेजुरीतील काही महत्त्वाची ठिकाणे; परंतु येथील सगळ्यात महत्वाचे ठिकाण 'गड जेजुरी.' क्रमशः
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel