इब्नबतुतला आणखी काही योगी प्रवासात भेटले . त्यांपैकी एकाने नारळाच्या झाडावरचा एक नारळ मंत्र सामर्थ्याने कळली पाडून दाखविला आणि त्यास खावयास दिला . ते त्याचे विलक्षण सामर्थ्य पाहून इब्नबतुतने त्याला बक्षीस म्हणून काही दिनार देऊ केले ; परंतु अनंताची इच्छा असलेल्या त्या योग्यासाठी हा पोरखेळ होता . त्या योग्याने हसून त्या नाण्यावर नुसती फुंकर मारली , त्या बरोबर जमिनीवर तशा चकचकीत नाण्यांचा भला थोरला ढीग निर्माण झाला . इब्नबतुतने ही सारी विलक्षण हकीकत तारीखवार आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेली आहे . वरील घटना कुणास असत्य वाटण्याचा संभाव आहे ; परंतु त्या पूर्णपणे खर्या असून अशा प्रकारचे सामर्थ्य संपन्न योगी त्या काळात भारतात होते ही गोष्ट नि:संशय खरी आहे . काही वर्षांपूर्वी भारतात कलकत्ता येथे श्रीनरसिंह स्वामी नामक एका भारतीय योग्याने शास्त्रज्ञ , डॉक्टर्स व विचारवंत यांच्या उपस्थितीत sulphuric acid ; corbolic acid आणि त्यानंतर लगेच potassium cinide ही विष द्रव्ये हसत हसत पिऊन दाखवली . या जालीम विषांचा त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम झाला नाही ! त्यानंतर स्वामींनी काचेचे चूर्ण सारखे प्रमाणे खून टाकले ! या प्रात्यक्षिकाच्या वेळी साक्षीदार म्हणून विश्वविख्यात शास्त्रज्ञ C . V . Raman हे देखील उपस्थित होते . या लोकविलक्षण चमत्काराचा उलगडा एकाही शास्त्रज्ञाला करता आला नाही व त्यांनी खुद्द श्री नरसिंह स्वामींनाच त्या बद्दल विचारले , तेव्हा स्वामी म्हणाले , सततच्या कठोर व शिस्तबद्द योगसाधनेने देह , मन व प्राण यावर योगी ताबा मिळवीत असतो . त्यामुळे असल्या विषांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही . १९३६ साली समाधिस्त झालेल्या श्री माधवराव महाराज या योगी पुरुषाने रेठवे या गावी एका मुलाला पाण्यावरून चालवून दाखवल्याची विलक्षण आश्चर्य कारक हकीकत श्री माधव नाथ संजीवनी या ग्रंथात पृष्ठ ७१ वर दिलेली आहे ! पेशवे काळात होऊन गेलेले श्री ब्रम्हेन्द्रस्वामी धावडशीकर हे सत्पुरुष देखील केळीच्या पानावर बसून खाडी पार करत असत व त्यांचा हा लोकविलक्षण चमत्कार पाहूनच सिद्धी याकुतखान त्यांचा पाठीराखा आणि परमभक्त बनला होता , अशी नोंद आहे ! सुमारे ४० - ५० वर्षांपूर्वी किर्लोस्कर वाडीजवळच्या कुंडल या गावात वास करणारे श्री ब्रम्हानंद स्वामी देखील पाण्यात सतरंजी सोडून तीरावरून लोकांना नदीतून पैलतीरी नेत असत . या उदाहरणानवरून भारतीय योग शास्त्राची महती कोणासही पटावी . अशाच एक प्रसंग संत श्रीअल्लमप्रभू यांच्या जीवनातला . अल्लम प्रभू हे एक सिद्धपुरुष होते . मुस्लिम त्यांना अल्ला तर हिंदू त्यांना ईश्वराचा अवतार समजत . त्यावरूनच त्यांना अल्लमप्रभु हे नाव पडले . त्यांच्या नावाने आजही दर्गे व मंदिरे आहेत . एकदा एक नाथपंथी योगी अल्लामांच्या दर्शनाला आला . त्यावेळी अल्लामा तेरदळ या गावी होते . तो योगी स्वतःला वज्रदेही म्हणत असे . अल्लम प्रभूंची परीक्षा पाहण्यासाठी तो त्याच्या सेवक - शिष्यांसोबत आला . त्यांनी प्रभूला आव्हान केले . स्वतःचे योग सामर्थ्य पटवून द्यावे या हट्टावर तो पेटला . त्या वज्रदेही योग्याने आपले सामर्थ्य प्रदर्शन म्हणून त्याने त्याच्या सेवकाला देहावर तलवार चालवण्यास सांगितले . आणि आश्चर्य ! त्या योग्यावर तलवारीचे घाव घालता खण खण असा आवाज झाला . उपस्थित सर्व लोक चकीत मुद्रेने त्या योग्याच्या सामर्थ्याची प्रसंशा करू लागले . गुर्मीत आलेला तो योगी नंतर अल्लमांना म्हणाला " आता तुझ्या सिद्धींचे प्रदर्शन कर ." अल्लामांनी त्याला त्यांच्या देहावर तलवार चालवण्यास सांगितली . त्याच्या सेवकाने त्वेषाने त्यांच्यावर वार केला . आणि अचंभ !! तलवार देहातून आरपार गेली . अचंभित झालेल्या त्या योग्याने स्वतः परत एक वार केला . परत तलवार आरपार . जणू काही हवेत फिरत आहे याप्रमाणे ती त्या अल्लामांच्या देहातून निसटली . योग्याला कळून चुकले . त्यांचा देह हाडा-मांसाचा नसून चैतन्य देह आहे . शून्य महाशून्यात विलीन झालेले ते चैतन्य देहासहित भूतलावर लोकोद्धार करीत आहेत . सिद्ध , योगी , महायोगी हे कधी सिद्धींचे प्रदर्शन करत नाहीत . अनंताची इच्छा असलेल्या योग्यानसाठी या सिद्धी म्हणजे निव्वळ पोरखेळ . अशाच अनेक सिद्धींचे त्यांच्या समोर लोटांगण असते . आजच्या वर्तमान काळात देखील असे विलक्षण योगी भारतात एखाद्या अज्ञात स्थळी असू शकतील . त्यांना प्रकट होउन जनसंपर्कात मिसळण्याची इच्छा नाही इतकेच ! थोड्याच वर्षांपूर्वी होऊन गेलेले प. पू . वासुदेवानंद सरस्वती उर्फ श्री टेंबे स्वामी महाराज हे देखील फार उच्च अवस्थेला पोहोचलेले महान योगी होते . त्यांना अनेक योग सिद्धी प्राप्त होत्या . त्यांचा उपयोग त्यांनी जीवनात फार क्वचितच केला . त्यांच्या चरित्रात याला आधार आहे . एकदा ते सहज बोलता बोलता असे म्हणाले , की " एकदम गुप्त होणे , एकदम दूर जाणे इत्यादी कामांसाठी सिद्धींचा उपयोग आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त तीन वेळा केला ." याचाच अर्थ त्यांना सिद्धी त्या सिद्धी पूर्णपणे अवगत होत्या . त्यांना फक्त त्यांचे प्रदर्शन करावयाचे नव्हते . याचे कारण या गोष्टी त्यांच्या दृष्टीने ' प्रदर्शनीय ' नव्हत्या ! अर्थात अनंताशी नाते जोडू पाहणाऱ्यांना या गोष्टी संकुचित वाटत असल्यास त्याबद्दल ही नवल वाटण्याचे कारण नाही !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel