महाभारत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. महाभारतात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या कधी कोणी सांगितल्या नाहीत आणि ज्याचा कोणी गंभीरतेने विचारही केला नाही. शास्त्रात महाभारताला पाचवा वेदही म्हंटले जाते. महाभारत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा ग्रंथ महर्षी व्यासांनी लिहला आहे.
- जेव्हा राजा युधिष्ठीर इंद्रप्रस्थमध्ये न्यायपूर्वक शासन करत होते, तेव्हा देवऋषी नारदमुनी यांनी, युधिष्ठीर राजाला सांगितले की, तुझे स्वर्गवासी वडील राजा पाडूं याना स्वर्गात स्थान मिळावे म्हणून तु राज सूर्ययज्ञ करावास. हे ऐकून युधिष्ठीराने राजसूर्य यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेच त्याने श्रीकृष्णाला बोलावून घेतले आणि विचारविनीमय केला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, की यावेळी फक्त राजा जरासंध हा तुझ्याएवढा बलवान आहे. त्यामुळे तुला आधी त्याला पराजित करावे लागेल.
- श्रीकृष्णाने युधिष्ठीराला जरासंधाच्या जन्मांची रंजक गोष्ट सांगितली. काही वर्षांपूर्वी मगध देशात बृहद्रथ नावाचा राजा होता. त्याला दोन पत्नी होत्या परंतु मुल नव्हते. एक दिवस राजा बृहद्रथ महात्मा चण्डकौशिक यांच्याकडे गेला आणि त्यांची सेवा केली तेव्हा चण्डकौशिकाने प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले आणि हे तुझा पत्नीला खायला दे म्हणजे तुला मुल होईल असे सांगितले. राजाने ते फळ कापून त्याचे दोन तुकडे केले आणि दोन्ही पत्नीला एक-एक खायला दिला. काही दिवसानंतर दोघींच्या गर्भातून बाळाचे दोन भाग जन्माला आले. राण्यांनी घाबरून बाळाचे हे तुकडे फेकून दिले.
- त्यावेळी जरा राक्षसीण तेथुन जात होती तिने ते दोन स्वतंत्र मानवी तुकडे पाहिले आणि तिच्या मायावी शक्तीने जोडले व पूर्ण बाळ तयार झाले. बाळ रडायला लागले. बाळच्या रडण्याचा अवाज ऐकुन दोन्ही राण्या बाहेर आल्या आणि त्यांनी बाळाला कुशीत घेतले. तेव्हा राजा बृहद्रथ तेथे आला आणि त्याने राक्षससणीला तिचा परिचय विचारला तेव्हा जराने तिने तिचे नाव सांगितले. राजाने खुश होऊन बाळचे नाव जरासंध ठेवले कारण त्याला जरा राक्षसीनीने त्याला जोडले होते.
- श्रीकृष्णाने युधिष्ठीरला सांगितले, की जरासंधाला महात्मा चण्डकौशिकांचा वर मिळालेला असल्याने त्याला हरविणे सहज शक्य नाही. त्याला फक्त कुस्तीतच हरवले जाउ शकते. त्यानंतर युधिष्ठीराची आज्ञा घेउन भगवान श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन हे वेष बदलून मगधला गेले आणि त्यांनी जरासंधाला कुस्तीचे आव्हान दिले. जरसंधाने हे आव्हान स्विकारले आणि भीमसोबत कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला. जरासंध आणि भीम यांच्यातील हे द्वदंयुद्ध कार्तिक कृष्ण प्रतिपदेपासून तेरा दिवस अखंड चालू होते. चौदाव्या दिवशी श्रीकृष्णाच्या आज्ञने भीमाने जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे केले.
- जरासंधाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या कैदेतील राजांना सोडवले. श्रीकृष्णाने या राजांना सांगितले,की युधिष्ठीर चक्रवर्तीपद मिळवण्यासाठी राजसूय यज्ञ करत आहे. त्यात तुम्ही त्याला मदत करा. या सर्व राजांनी श्रीक़ृष्णाचा प्रस्ताव स्विकारला आणि युधिष्ठीराला सर्वतोपरी मदत दिली.श्रीकृष्णाने जरासंधाचा मुलगा सहदेवाला अभयदान दिले आणि त्याला मगधचा राजा बनवले.
- जरसंधावर विजय मिळवल्यानंतर भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी दिग्विजय यात्रेला चार वेगवेगळ्या दिशेला सुरवात केली. अर्जन उत्तर दिशेला गेला आणि त्याने सर्व राज्य जिंकली. काही राजांनी युद्ध न करताच हार मान्य केली तर काहीनी मैत्री स्विकारली. याचप्रकारे भीमाने पूर्व, सहदेवाने दक्षिण तर नकुलाने पश्चिम देशेला असण-या राज्यांवर आपला आधिकार प्रस्थपित केला.
- सर्व राजांवर विजय मिळवल्यानंतर राजा युधिष्ठीराने राजसुय यज्ञ करण्याचे ठरवले. त्याने सर्वात पहिले श्रीकृष्णाला आंमत्रण दिले. त्यानंतर पितामह भिष्म, महर्षी वेदव्यास द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, महात्मा विदूर, कृपाचार्य, दूर्योधन इत्यादी राजांना यज्ञासाठी बोलवले. प्रत्येक राजा आपापल्यापरीने भेट वस्तू घेउन यज्ञाला आले.
- यज्ञाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अभिषेकाच्या दिवशी ब्राह्मणांनी यज्ञशाळेत प्रवेश केला. त्यानंतर पितामह भिष्म युधिष्ठीराला म्हणाले,की हे राजा तु आता येथे उपस्थित असणा-या सर्व राजांचा योग्य सत्कार कर पण सर्वात महान असलेल्या राजापासुन सुरवात कर. तेव्हा युधिष्ठीराने मी कोणापासून सुरवात करू असे विचारले. यावर पितामह भिष्म म्हणाले, की सर्वात पहिले श्रीकृष्णाची पूजा कर.
- या सभेत श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपालही उपस्थित होता. शिशुपाल कृष्णाच्या विरोधात होता. श्रीकृष्णाची सर्वप्रथम पूजा होताना पाहून तो चिडला आणि त्याने युधिष्ठीराला आव्हान केले. शिशुपालने महात्मा भिष्म पितामहाबद्दलही वाईट शब्द उच्चारले. युधिष्ठिराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु शिशुपाल तरीही शांत झाला नाही आणि त्याने श्रीकृष्णाचा अपमान करणे चालूच ठेवले. पांडव शिशुपालचा वध करण्यासाठी सरसावले परंतू श्रीकृष्णाने त्यांना रोखले.
शिशुपालसारख्या पापआत्म्याला तुम्ही का वाचवत आहात असा प्रश्न पांडवानी श्रीकृष्णाला विचारला. यावर श्रीकृष्णाने एक गुप्त गोष्ट सांगितली.
जेव्हा चेदीराजाचा वंशात शिशुपालचा जन्म झाला तेव्हा त्याला तिन डोळे आणि चार हात होते व त्यावेळी तो गाढवाच्या आवाजात रडायला लागला. त्याचवेळी एक आकाशवाणी झाली की, ' हा मुलगा फार पराक्रमी होईल आणि ज्या व्यक्तीच्या कुशीत गेल्यानंतर याचे दोन हात व तिसरा डोळा नष्ट होईल तोच व्यक्ती याचा वध करू शकेल.
- पुढे श्रीकृष्णाने सांगितले की, मी एकदा सहज आत्याला भेटण्यासठी गेलो होतो तेव्हा मी शिशुपालला कुशीत घेतले आणि त्याचे अनावश्क अवयव नष्ट झाले. तेव्हा आत्याने मला त्याला न मारण्याची विनंती केली. तेव्हा मी आत्याला शिशुपालचे शंभर जीव घेण्यायोग्य अपराध माफ करण्याचे वचन दिले आहे. शिशुपालचे शंभर अपराध लवकरच पूर्ण होतील त्यानंतर मी त्याचा वध करणार आहे.
- श्रीकृष्ण हे पांडवाना सांगत असतानाच शिशुपालने परत श्रीकृष्णाचा अपमान केला. शिशुपालचे शंभर अपराध पूर्ण होताच श्रीकृष्णाने सुर्दशनचक्राने शिशुपालचे डोके उडवले. युधिष्ठीराने शिशुपालच्या मुलाला चेदी राज्याचा राजा बनवले आणि यज्ञ पूर्ण केला. यज्ञ संपवून सर्व राजे परत गेले आणि श्रीकृष्ण द्वारकेला परतला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.