शिवदैवाताची उपासना करणारे लोक " नम: शिवाय " या पंचाक्षरी किंवा ' ॐ नम: शिवाय ' या षडाक्षरीचा मंत्राचा जप करतात. रुद्रभिषेकालाही या संप्रदायात फार महत्त्व आहे. हा जप आणि रुद्राभिषेक यामुळे शिवदैवत प्रसन्न होऊन अनेक घोर संकटातून सुटका होते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे. या संदर्भात पुढील आश्चर्यकारक हकीकत खरच लक्षात ठेवण्यासारखी आहे. हि विलक्षण सत्यकथा इ.स. १८८० च्या आसपास ब्रिटीश आणि अफगाण यांच्यात भयानक युद्धसुरु झाले. अफगाण सेनापती आयुबखान याने कंदाहारआणि झेलमच्या पहाडी भागात ब्रिटीशांचा धुव्वा उडवून त्यांना पाळता भुई थोडी केली होती ! या धुमश्चक्रीत हजारो ब्रिटीश जवान ठार झाले ! त्यामुळे ब्रिटीश सेनानी कमालीचे चिंताग्रस्त झाले. या पराभवाचे शल्य त्यांच्या मनात एकसारखे डाचत होते व त्यातून मार्ग काढण्यासाठी ते रात्र रात्र जागून नव्या नव्या योजना बनवीत होते. त्यावेळी ब्रिटीशांची एक छावणी माळवा प्रदेशातील आगर या ठिकाणी होती. त्या छावणीचा सेनापती होता कर्नल मार्टिन. विलक्षण शूर आणि धडाडीचा माणूस होता तो ! त्यामुळे मुख्य सेनापतीला त्या संकटकाळात त्याचीच तीव्रतेने आठवण झाली व त्याने कर्नल मार्टिनला संदेश पाठवून अफगाण सेनेवर चालून जाण्याचा तातडीचा संदेश दिला. त्या आदेशानुसार कर्नल मार्टिन हजारो तगडे सैनिक घेऊन कंदाहारच्या डोंगराळ भागाकडे निघाला. आपली पत्नी लेडी मार्टिन हिला मात्र त्याने आगर चावानितच ठेवले. कारण तिला घेऊन कंदाहरकडे जाने फारच धोक्याचे होते. कंदाहारकडे पोहचल्यावर कर्नल मार्टिनने अफगाण सेनेवर प्रचंड हल्ला केला. त्यावेळी 'न भूतो न भविष्यति' असे युद्ध झाले. हे युद्ध दीर्घकाळ चालू होते. या कळत कर्नल मार्तींची काहीच हकीकत न समजल्यामुळे लेडी मार्टिन अतिशय चिंतेत पडली. तिच्या मनात नाही नाही त्या दुष्ट शंका येऊ लागल्या. तिला अफगाण लोकांचे शौर्य ठाऊक होते. तसेच, कंदाहारचा डोंगराळ प्रदेश अतिशय धोक्याचा आहे या गोष्टीची कल्पना होती. त्यामुळे आपल्या पतीचे फार बरे-वाईट तर झाले नाही ना या शंकेने ती त्रस्त झाली आणि तिला काहीच सुचेना ! एक दिवस तिला सहज विरंगुळा म्हणून ती घोड्यावर रपेट करण्यासाठी निघाली. डोक्यात सतत पतीचीच काळजी होती. फिरत फिरत ती आगर छावणीच्या ईशान्य दिशेस असलेल्या बाणगंगा नदीजवळ आली. हि नादी डोंगराळ भागात असून ती आगर छावणीपासून दीड मैल अंतरावर होती. या नदीच्या किनाऱ्यावर श्रीवैजनाथ महादेवाचे प्रसिध्द पुरातन मंदिर होते. लेडी मार्टिन घोड्यावरून सहज फिरत फिरत या वैजनाथ महादेवाच्या मंदिराजवळ आली. त्या मंदिराच्या आजूबाजूला दात जंगल होते व रस्त्यात एकही माणूस दिसत नव्हता; परंतु मंदिराच्या जवळ येताच तिला माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे तिने मंदिराजवळच आपला घोडा एका झाडाला नित बांधला आणि ती मंदिराच्या आत येऊन एका ओट्यावर बसून राहिली. एका गोर्या इंग्रज महिलेला शिवमंदिरात आलेले पाहून मंदिरातील सर्वच जन चकित झाले व तिच्याकडे टकमक पाहू लागले. त्यापैकी काही धीट लोक पुढे झाले व त्यांनी लेडी मार्तींच्या जवळ येऊन तिची विचारपूस केली. ती कर्नल मार्तीनाची पत्नी आहे हे समजताच सर्वजन तिच्याशी अत्यंत आदबीने बोलू लागले. त्यावेळी गाभार्यात शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक चालू होता. सुगंधी द्रव्याचा परिमल सर्व मंदिरभर पसरला होता. शिव्पिंदिसमोरशुद्ध तुपाचे दीप शांतपणे तेवत होते.तेथले वातावरणाच मोठे प्रसन्न होते ! लेडी मार्टिनने त्यांना विचारले ,"हे कुणाचे मंदिर आहे ? हि दुधाची धार त्या लांबट गोल दगडावर (पिंडीवर) एकसारखी कशासाठी पडते आहे?" त्यावर त्या लोकांनी तिला सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. सकाळ मनोरथ सिद्ध करणाऱ्या भगवान शिवाचे माहात्म्यतिला वर्ण करून सांगितले. ते वर्णन ऐकून लेडी मार्टिनचे कुतूहल चांगलेच जागृत झाले. तिने भगवान शिवाबद्दल त्या लोकांना खूप प्रश्न विचारले. त्या लोकांनी तिला एका ब्राम्हणाकडे जायला सांगितले व त्याच्याकडून सगळी माहिती घे तिने पण त्या लोकांचा सल्ला ऐकून ब्राम्हनाकडे गेली आणि त्या ब्राम्हणाने तिला भगवान शंकराची इत्थभूत माहिती दिली. त्यांच्या भक्तीचे माहात्म्य तिला समजावून सांगितले. ते म्हणाले," जो मनुष्य भगवान शंकराची नित्य पूजा करून त्यांच्या मंत्राचा श्रद्धापूर्वक जाप करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात !" त्या ब्राम्हणाने संगिलेली ती हकीकत ऐकून लेडी मार्तीनाला भगवान वैजनाथ महादेवाविषयी श्रद्धा व भक्ती उत्पन्न झाली आणि तिने त्यांना विचारले, कि "भगवान वैजनाथ महादेव जर सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात तर ते माझीही मनोकामना पूर्ण करतील का? " "का नाही ? अवश्य पूर्ण करतील !" ब्राम्हण म्हणाला "कारण भगवान वैजनाथ अत्यंत दयाळू आहेत. त्यांची खऱ्या श्रद्धेने भक्ती करणाऱ्या भक्तावर ते प्रसन्न होतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात मग तो भक्त हिंदू , मुसलमान, ख्रिश्चन कोणत्याही धर्माचा असो. त्यांना हवी फक्त अंत:करणापासून भक्ती आणि त्यांच्यावर निनांत श्रद्धा !" त्यांचे हे बोलणे ऐकून लेडी मार्टिनच्या दु:खी मनात आशीच अंकुर उगवला. तिने एकावर भगवान वैजनाथ महादेवाकडे मोठ्या आदराने पहिले व ती त्यांना मनोमन शरण गेली. नंतर तिने आपल्या पतीच्या संदर्भातील आपली काळजी त्यांना निवेदन केली आणि कोणती उपासना केली असता भगवान वैजनाथ महादेव हे संकट दूर करतील असा प्रश्न विचारला. त्यावर ब्राम्हण म्हणाले,"भगवान वैजनाथ महादेव हे अत्यंत दयाळू दैवत आहे. त्यांची श्रद्धाभक्तीपूर्वक उपासना केली तर ते प्रसन्न होतात !" "पण हि उपासना कशी करायची ?" लेडी मार्टिनने कुतूहलाने विचारले. "त्यासाठी भगवान वैजनाथ महादेवाचा जप करायचा. " "कोणता जप? " "ओं नम: शिवाय" या मंत्राचा. "आणि काय करायचे ?" "दर सोमवारी त्याला रुद्राभिषेक करून त्याची पूजा बांधायची. तसेच रोज सकाळी स्नान करून त्याचे दर्शन घ्यायचे व आपली मनोकामना पूर्ण करण्याबद्दल त्याची मनोमन प्रार्थना करायची." "ठीक. " "हे सर कराल तुम्ही ?" "होय, मी ते श्रद्धापूर्वक करीन. " "मग भगवान वैजनाथ तुमची मनोकामना निश्चित पूर्ण करतील !" दुसऱ्या दिवशी सोमवार होता. लेडी मार्टिन त्या ब्राम्हणाला म्हणाली, कि "मी उद्या सकाळी स्नान करून पुन्हा येईन . तुम्ही म्हणता तसा अभिषेक उद्यापासून सुरु करू. तुम्ही सांगितलेला जपही मी उद्यापासून सुरु करीन. " "ठीक." आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून लेडी मार्टिन आपल्या छावणीत परत आली. तिच्या दु:खी कष्टी निराश मनात आता आशेचा अंकुर उगवला होता. तिच्या डोळ्यासमोर मघा पहिलेली भगवान वैजानाथ महादेवाची मूर्तीच एकसारखी तरळत होती. दुसऱ्या दिवशी लेडी मार्टिन पाहते लवकर उठली. तिने स्नान उरकले आणि ती चालतच मंदिरात आली त्या दिवसापासून रोज अकरा ब्राम्हण भगवान वैजनाथ महादेवावरतिच्यासाठी रुद्राभिषेककरू लागले. हा कर्म सतत अकरा दिवस चालू होता. ब्राम्हणांचा रुद्राभिषेक होईपर्यंत लेडी मार्टिन डोळे मिटून "ॐ नम:शिवाय"चा जप करीत शांतपणे बसून राही.अकरा दिवसांनी महारुद्र पूर्ण झाला आणि लेडी मार्टिनने त्याच दिवशी श्रद्धापूर्वक ब्राम्हणभोजन घातले व सर्व ब्राम्हणांना भरपूर दक्षिणा दिली. हा कार्यक्रम उरकल्यावर ती आपल्या छावणीत परत आली ती येताच एका कारकुनाने एक मोठा लिफाफा तिच्या हातात ठेवला. तो कारकुन तिच्या येण्याचीच इतका वेळ वाट पाहत होता कारण तो लिफाफा फार महत्त्वाचा होता. तो सरकारी लिफाफा लेडी मार्टिनने अतिशय कुतूहलाने उघडला व आतला कागद वाचला. त्या पत्राच्या शेवटी कर्नल मार्टिनची आपल्या प्रिय पतीची सही पाहून लेडी मार्टिनचे डोळे आनंदातिशयाने चमकले. तिने ते पत्र घाईघाईने वाचले कर्नल मार्टिनने लिहिले होते. "लाडके, आज मी अत्यंत खुषीत आहे. कारण नुकत्याच झालेल्या भयानक युद्धात आपल्या पराक्रमी बहाद्दरांनी अफगाणांचा पार धुव्वा उडविला; परंतु हा विजय प्राप्त होण्यापूर्वी आम्हांला कितीतरी भयंकर दिव्यातून जावे लागले. एकदा तर माझ्यासकट ब-याच जवानांना अफगानांच्या कैदेत राहावे लागले. त्यातून आमची कधी काळी सुटका होईल अशी देखील आशा आम्हांला स्वप्नातली वाटत नव्हती. बहुधा आम्हाला येथेच मरण येईल असे आम्ही समाजात होतो; परंतु गेल्या दहा-बारा दिवसापासून जणू एखादी अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी उभी राहून आमचे रक्षण करीत आहे असा भास आम्हाला एकसारखा होत होता आणि लवकरच आमच्या शूर जवानांनी अफगाणांचा पार धुव्वा उडवून आमची कैदेतून सुटका केली ! लाडके, आता युद्ध जवळजवळ संपल्यासाराखेच आहे आणि तुला भेटण्यासाठी मी अगदी लवकरच आगर छावणीकडे निघत आहे... अगदी लवकरच !" केवळ तुझाच... -जे. मार्टिन -आपल्या प्रिय पतीच्या खुशालीचे हे शुभवर्तमान महारुद्र पूर्ण होण्याच्या दिवशीच प्राप्त व्हावे या योगायोगाचे लेडी मार्तीनाला विलक्षण आश्चर्य वाटले. भगवान वैजनाथ महादेवाची कृपा पाहून तिचे डोळे अश्रुनी भरले. या घटने मुले तिचा 'शिव' दैवतावर पूर्ण विश्वास बसला आणि ती भगवान वैजनाथच्या दर्शनासाठी रोज सकाळ-संध्याकाळ त्या मंदिरात येऊ लागली. तसेच 'ॐ नम: शिवाय' हा जफी ती मोठ्या श्रद्धेने करू लागली. पुढे थोड्याच दिवसात कर्नल मार्टिन आगर छावणीत परत आले. त्या दिवशी छावणीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर लेडी मार्तीनाने भगवान वैजनाथ महादेवाने आपल्यावर कास्धी कृपा केली ताची इत्थंभूत हकीकत आपल्या पतीला निवेदन केली. ती ऐकून कर्नल मार्टिनचीही भगवान वैजानाथावर श्रध बसली आणि तोही त्यांच्या दर्शनासाठी पत्नीबरोबर सकाळ-संध्याकाळ जाऊ लागला. एक दिवस लेडी मार्टिन त्या मंदिरात उभी असताना ते जीर्ण मंदिर पाहून तिच्या मनात एकाएकी असा विचार आला, कि या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. भगवान वैजनाथला अश्या पडक्या वस्तुत ठेवणे बरे नव्हे. तिने हा विचार आपल्या पतीला सांगितला व कर्नल मार्टिनला तो लगेचच पटला. -नि दुसऱ्याच दिवसापासून त्या मंदिराच्या नुतानिकारणाला प्रारंभ झाला आणि त्या कामावर देखरेख करण्यासाठी लेडी मार्टिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मंदिरातच राहू लागली. थोड्याच दिवसात त्या ठिकाणी नवे कोरे, अत्यंत देखणे असे मंदिर उभे राहिले ! त्यानंतर पुन्हा ब्राह्मणभोजन, रुद्राभिषेक वैगेर धार्मिक कार्यक्रम अतिशय थाटात पार पडले. आणि भगवान वैजनाथच्या कृपाप्रसादाने पुन्हा एक चमत्कार घडला ! हा समारंभ पार पडल्यावर दोन-चार दिवसातच कर्नल मार्टिनच्या बढतीचा हुकुम आला. अफगाणयुद्धात अपूर्व पराक्रम गाजविल्याबद्दल त्याला हि बढतीची जागा ब्रिटीश सरकारने बहाल केली होती ! कर्नल व लेडी मार्टिन यांना हा देखील भगवान वैजनाथ महादेवाचाच कृपाप्रसाद वाटला वा त्यांनी भगवान वैजनाथला मनोमन वंदन केले ! ही घटना म्हणजे या पंक्तीची प्रचीतीच ...... " अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चांडाल का .... मौत भी उसका क्या बिघाडे जो भक्त हो महाकाल का !! " हरssss हरssssss महादेवsssssss
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel