६.  दागिन्यांची हौस

मी पाचव्या इयत्तेत होतो. आमची वार्षिक परीक्षा व्हावयाची होती. 'खरे' आडनावाचे परीक्षक येणार होते. सर्व मुले अभ्यासाची तयारी करीत होती. आमचे हेडमास्तर आम्हांला रोज निरनिराळे प्रश्न विचारुन उत्तरे काढून घेत असत.

आले. खरे परीक्षक आले. चौथी-पाचवीची परीक्षा रविवार होता तरी त्याच दिवशी घेण्याचे ठरले. जेथे परीक्षक उतरले होते त्याच घरी आम्हांला बोलावण्यात आले होते. आम्ही सारे ओळीने जाऊन बसलो. वाटेत येतानाही हेडमास्तर प्रश्न सुचवीत होते. त्यांनी विचारले, 'सर्वांत थोर पेशवा कोण ?'

मी म्हटेल, 'पहिला बाजीराव.'

हेडमास्तर म्हणाले, 'नाही. पहिला माधवराव हा सर्वांत थोर पेशवा.' क्लाइव्ह शिपायांना लढाईसाठी नेत असता वाटेत कवाईत शिकवीत असे. आमचे मास्तर रस्त्यात जाता जाता आम्हांला परीक्षेसाठी तयार करीत होते.

परीक्षक आले. सारी मुले उभी राहिली. पुढे परीक्षा सुरु झाली. गणिते घालण्यात आली. इतिहासाचे प्रश्न झाले. आम्ही कविता म्हणून दाखविल्या. जरा हसत खेळत मोकळेपणाने परीक्षा चालली होती.

इतक्यात माझ्या हातीतील शिंदेशाही कडीतोडयांकडे परीक्षकांची दृष्टी गेली. माझ्या कानात भिकबाळीही होती. परीक्षकात व माझ्यात पुढील संवाद झाला-

परीक्षक :- काय रे बाळ ! तुझे नाव काय ?

मी :- माझे नाव श्याम.

परीक्षक :- श्याम ! तुझ्या हातात हे कडीतोडे कोणी घातले ?

मी :- बाळशेट सोनाराने.

परीक्षक :- सोनाराला कोणी सांगितले ?

मी :- वडिलांनी.

परीक्षक :- कानात भिकबाळी कोणी अडकविली ?

मी :- माझ्या आजीने. मुंजीची ती भिक्षावळ होती.

परीक्षक :- तुझा कान टोचला तेव्हा तू रडलास की नाही ?

मी :- हो. रडलो.

परीक्षक :- किती दिवस कान दुखत होता ?

मी :- बरेच दिवस दुखत होता. तूपवातीने समईवर मी रोज रात्री शेकवीत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel