सुत्तनिपाताची प्राचीनता :- बिद्धधर्माच्या अभ्यासाकरितां, धम्मपदाप्रमाणें, सुत्तनिपात या ग्रंथाचा वरचेवर उल्लेख केला जातो. कारण हा ग्रंथ फार प्राचीन आहे व म्हणून त्यांत आढळणारा बुद्धाचा उपदेशही जुनाच आहे. हल्लींच्या स्वरूपांतील सुत्तनिपात हा गाथासंग्रह केव्हां अस्तित्वांत आला हें जरी नक्की सांगतां आलें नाहीं, तरी “मिलिन्द-पञ्ह” या ग्रंथांत त्याचा अनेक ठिकाणीं (देवनागरीप्रत पान ३६३, ३७८, ४०३, ४०५) नामनिर्देश करून त्यांतील गाथा उद्धृत केल्या आहेत. हल्लींच्या सुत्तनिपातांत अंतर्भूत झालेल्या अट्ठक-वग्गाचा उल्लेख संयुक्त ३.१२, विनय १.१९६-९७, उदान ५.६ ह्यांत आलेला आहे. पारायणवग्गाचा उल्लेख संयुक्त २.४९, अंगुत्तर १.१३३-१३४; २.४५; ३.३९९, ४०१; ४.६३ ह्यांत आलेला आहे. अंगुत्तरनिकायांत तर पारायणवग्गांतील पुण्णकपञ्ह, उदयनपञ्ह, व मेत्तेय्यपञ्ह यांचा प्रत्यक्ष उल्लेख असून त्यांतील गाथा उद्धृत केलेल्या आहेत. पहिल्या अडतीस सूत्रांपैकीं निदान सात सूत्रें तरी इतर१ [१ सूत्र ४ = सं.१.१७२; ८= खुद्दक ९; १३= खुद्दक= ५; १५ = जातक ३.१९६; १६ = खुद्दक ६; ३३= म. (सूत्र ९२); ३ = अपदान २ (पच्चेकबुद्धापदानं, गाथा ९०-१३०, Sinh. ed., Coclmbo, 1930.] ठिकाणीं आलेलीं आहेत. अनेक महायानग्रंथांत२ [२ अर्थपदसूत्र, इंग्रजी प्रस्तावना पान १-२; Sylvain Levi, Journal Asiatique, १९१५ (मे-जून) पृष्ठ ४०२-२४.] “अर्थवर्गीय” आणि “पारायणाचा” उल्लेख आलेला आहे. या सुत्तनिपात ग्रंथांत प्रास्ताविक गद्य भागावांचून अनेक सूत्रांचा संग्रह केलेला आहे. त्यांतील विषयांचा विचार करतांना बौद्धधर्माच्या आरंभींच्या अवस्थेचेंच वर्णन यांत दिसतें. कांहीं सूत्रें बौद्धधर्माच्या आरंभकालींचीं व कांहीं बुद्धाच्या पहिल्या शिष्याच्या३ [३ Winternitez, History of Indian Literature, Vol. II (English Translation) p. 93 (Calcutta Uni. 1933).] वेळेचीं वाटतात. सुत्तनिपात तिपिटकांतील सर्वांत जुनें काव्य होय. खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक इत्यादि छोट्या काव्यांची जरूरी भासण्यापूर्वीं सुत्तनिपात अस्तित्वांत आलें असलें पाहिजे. थेरगाथा, थेरीगाथा, बुद्धवंस, चरियापिटक, अपदान हीं पुस्तकें निस्संशय मागाहून तयार झालेलीं दिसतात. म्हणून असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं सुत्तनिपातांतील बर्याचशा सूत्रांची संहिता ठोकळ मानानें बुद्धाच्या परिनिर्वाणानंतरच्या पहिल्या शतकांतील पूर्वार्धांतच तयार झाली असावी१.
[१ सुत्तनिपाताचें प्राचीनत्व खालील पुराव्यावरूनही दिसतें:-
(१) ह्या ग्रंथावरून बुद्धानुयायी लोक व बुद्धधर्म आरंभीच्या अवस्थेतील भासतात.
(२) धुतंगें किंवा पारमिता वगैरेसारख्या बौद्धधर्माच्या पारिभाषिक वैशिष्ट्यांचा उल्लेख सांपडत नाहीं.
(३) बुद्धाचे शरीरावशेष किंवा स्तूप यांचा उल्लेख सांपडत नाहीं.
(४) अथर्ववेदाच्या अभ्यासाला फारसें महत्त्व दिलें जात नव्हतें.
(५) ब्राह्मण यज्ञ वरचेवर करीत व ह्या यज्ञांत गोहत्या होत असे. यज्ञांपैकीं कांहींचा उल्लेख गाथा ३०३ मध्यें सांपडतो. त्यांतील कांहीं नांवें अप्रसिद्ध आहेत.
(६) सुत्तनिपातांतील कांहीं गाथांचे पाद नंतरच्या पालि पुस्तकांत आढळतात. उदा. धम्मपद, उदान, इतिवुत्तक, थेरगाथा, इत्यादि; किंवा नंतरच्या बौद्ध संस्कृत पुस्तकांतही सांपडतात.
(७) जुनीं वैदिक व्याकरणांतील रुपें व भाषाशैली.
(८) जुन्या पद्धतीची छन्दोरचना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.